Home > Crime news > अल्पवयीन मुलांची दगडानी ठेचुन निर्घृण हत्या.

अल्पवयीन मुलांची दगडानी ठेचुन निर्घृण हत्या.

The brutal murder of minors by stoning.

अल्पवयीन मुलांची दगडानी ठेचुन निर्घृण हत्या.
X


अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी आबासाहेब शिरसाठ.

मो. ९११२८८५२४७


अहमदनगर /नेवासा तालुक्यातील वरखेड या गावात अल्पवयीन मुलाची दगडानी ठेचुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की आज सकाळी वरखेड गावचे पोलीस पाटील. संतोष घुगांसे यांना गावातील व्यक्ती कडूबाळ गोरे यांनी फोनकेला. व सांगितले की दत्तात्रय गोरे यांच्या शेतातील चारी जवळ एक आठ नऊ. वर्षाच्या अल्पवयीन मुलाचेडोके दगडानी ठेचुन त्याचा निर्घृण खुन करण्यात आला आहे. माहिती समजताच. त्यांनी नेवासा पोलीस निरीक्षक. कर्तव्यदक्ष अधिकारी. श्री. विजय करे यांना माहिती दिली. ते आपल्या पोलीस सहकार्या सोबत घटना स्थळी दाखल झाले.

व पुढील तपास चक्र वेगाने फिरली वरखेड या गावात गेल्या सात वर्षांपासून सिमा उत्तम खिलारी हि महिला आपले तिन मुले 1) आदित्य १० वर्षे 2)सोहम८वर्ष 3)पंकज५वर्ष.यांच्यासह वरखेड देवीमंदिरा जवळ गावातील व्यक्ती श्री साहेबराव शिंदे यांच्या घरात राहते. तिच्या सोबत समाधान महादु ब्राम्हणे हा सुध्दा राहतो. तो मिस्तरी आहे. खुनाची बातमी गावभर पसरताच. सिमा व समाधान घटना स्थळी पोहचले. व मुलगा सोहम चा दगडाने ठेचलेल डोक गवतावर रक्ताच्या उडालेल्या चिळकांड्या पाहून जोरजोरात रडू लागले. पोलिस निरीक्षक श्री विजय करे यांनीपंचनामा करून सिमा उत्तम खिलारी व समाधान महादु ब्राम्हणे. यांना ताब्यात घेण्यात

आले आहे. पुढील तपास चालु आहे.

.

Updated : 6 July 2021 4:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top