Home > Crime news > मंगरूळपीर येथे शिक्षिकेची आत्महत्या

मंगरूळपीर येथे शिक्षिकेची आत्महत्या

Teacher commits suicide at Mangrulpeer

मंगरूळपीर येथे शिक्षिकेची आत्महत्या
X

वाशिम:-मंगरूळपीर येथे एका अधिकार्‍याच्या शिक्षिका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना शहरातील मानोली रोड वर ता. २८ चे दुपारी एक वाजताचे सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वैशाख वसंतराव वाहुरवाघ वय 43 वर्ष व्यवसाय नोकरी , रा . मानोली रोड मंगरुळपीर यांनी पोलिसांत तक्रार दिली की,ता. २८ रोजी फिर्यादी व फिर्यादीची पत्नी वैशाली वैशाख वाहुरवाघ वय ४० वर्ष रा . मानोली रोड यांनी एक वाजता जेवन केले. नंतर मृतक हिने कोरोनाची लस घेतली असल्यामुळे ती आराम करण्यासाठी वरच्या रुममधे गेली . बराच वेळ झाला ती खाली आली नाही म्हणुन माझे मुलाने तीला आवाज दीला परंतु तिने दरवाजा उघडला नाही. म्हणुन मी स्वता जावुन दरवाजा वाजविला परंतु तिने दरवाजा उघडला नाही. म्हणुन मी खिडकीचे काच फोडुन दरवाजा उघडला असता मृतक हिने घरातील सिलींग फँनला दोरीने गळफास घेवुन दिसली. अशा फीर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Updated : 28 May 2021 10:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top