Home > Crime news > तलवारी ने केक कापणे पडलें महाग.

तलवारी ने केक कापणे पडलें महाग.

Talwari sipped the cake, Mahag.

Hiहिंगणघाट शहरात दुसरी घटना

दिनांक15/08/2021 रोजी रात्री 00.10 ते 00.45 वाजता दरम्यान सिंधी काॅलनी हिंगणघाट येथे राहणारा विक्की मोतीराम तकतानी वय 27 वर्षे याने त्याचे वाढदिवसानिमित्त त्याचे राहते घरासमोर एका धारदार व टोकदार लोखंडी तलवारीने केक कापुन त्याचे फोटो व्हाॅटसएप सारख्या सोशल मिडीयावर प्रसारीत केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मनात दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले. नमुद ईसमाने हातात लोखंडी व धारदार टोकदार तलवार बाळगुन त्याचे वाढदिवसाचा केक कापुन सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्राचे प्रदर्शन केल्याचे फोटो प्रसारीत झाले. सदरचे फोटो गुन्हे प्रगटीकरण पथकास प्राप्त होताच त्याची तात्काळ दखल घेवुन ठाणेदार श्री. संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनानुसार तलवारीचे सार्वजनीक ठिकाणी प्रदर्शन करणारा विक्की मोतीराम तकतानी वय 27 वर्षे रा. सिंधी काॅलोनी हिंगणघाट यास ताब्यात घेवुन त्याचेविरूध्द अप. क्रमांक 719/2021 कलम 4, 25 शस्त्र अधिनियम अन्वये कारवाई करून आरोपीस अटक करण्यात आली. पोलीस प्रशासनाकडुन अश्याप्रकारे तलवारीचे प्रदर्शन करून वाढदिवस साजरे करणाऱ्यावीरूध्द आणखी कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरची कार्यवाही मा. श्री. प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट आणी ठाणेदार श्री. संपत चव्हाण यंाचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, सुहास चांदोरे, प्रशांत वाटखेडे आणी उमेश बेले यांनी केली.

Updated : 20 Aug 2021 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top