ऊपविभागिय पोलिस अधिकार्यांची धडाकेबाज कारवाई.....
किन्हीराजा येथे शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटख्यावर छापा
X
वाशिम:- दि.२२ रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे , यांना गुप्त माहीती मिळाली की , ग्राम किन्हीराजा येथील शंकरआप्पा डांगे हे त्यांच्या न्यु गोविंद किराणा दुकानाच्या दुस – या मजल्यावर अवैध गुटखा साठवुन त्यांची चोरून विक्री करीत असतो, अशी खात्रीलायक माहिती मिळाली असता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांचे पथक पाठवुन किन्ही राजा पोलिस चौकी च्या हाके च्या अंतरावर असलेल्या किन्हीराजा येथील न्यु गोविंद किराणा दुकानावर छापा मारला असता न्यु गोविंद किराणा दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर जावुन पाहले असता पांढ – या रंगाचे थैलीमध्ये
१ ) ६,००० / -रूचा MAZI पान मसाला पिवळया रंगाचे ५० पाउच प्रत्येकी किंमत १२० रू
२ ) ७२६ / -रूचा v1 Tobacco लाल हिरवे रंगाचे ३३ पाउच प्रत्येकी किंमत ३० रू
३ ) १६,६०० / -रूचा Nazar premium निळे , लाल , हिरवे , पिवळे , कथीया रंगाचे ८३ पाउच प्रत्येकी किंमत २०० रू
४ ) .७,८०० / -रूचा WAH पान मसाला ६५ नग पाउच प्रत्येकी किंमत १२० रू
५. ) २,५३५ / -रूचा Wchewing Tobacco चे १६ ९ पाउच प्रत्येकी किंमत १५ रू
६ ) ३,४५० / -रूचा विमल पान मसाला पिवळे , लाल २३ पाउच प्रत्येकी किंमत १५० रू
७ ) ४,५५४ / -रूचा विमल जुबा केसरी पान मसाला ३५ पाउच प्रत्येकी किंमत १ ९ ८ रू
८ ) ३ , ९ ६० / -रूचा पान बहार निळे पाउच २२ नग प्रत्येकी किंमत १८० रू
९ ) ९ ३० / -रूचा MZ फिकट पिवळया रंगाचे तंबाखु पाउच ३१ नग प्रत्येकी किंमत ३१ रू असा मानवी जिवीत्वास अपायकारक असलेला व शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा एकुण किंमत एकुण .४६,५५५ /00 रू माल अवैध रित्या साठवुन विक्री करीत असताना मिळुन आला आहे. सदर गुन्हयातील माल जप्त करून सदर जप्त मालाची माहीती मा अन्न सुरक्षा अधिकारी , अन्न व औषध प्रशासन विभाग अकोला जि अकोला यांना देण्यात आली आहे. सदर पोलिस चौकी पासून हाके च्या अंतरावर जर हजारो रुपयाचा प्रतिबंधित केलेला गुटखा पकडल्या जात असेल तर किन्ही राजा पोलिस चौकी अंतर्गत 18/20 लहान मोठी गाव व खेडी असून त्या मध्ये काय परिस्थिती असू शकते याचा विचार न केलेलाच बरा ठाणेदाराच्या डोळ्यात धूळ फेक करीत किन्ही राजा पोलिस चौकी अंतर्गत लाखो रुपयांची उलाढाल प्रतिबंधित केलेल्या गुटख्यावर होत असल्याची उघडपणे सुज्ञ नागरिक बोलताना दिसून येत आहे.किन्ही राजा पोलिस चौकी च्या हाकेच्या अंतरावरील माहिती नसणे हे कधी न सुटणारे कोडं असू शकते.सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक साहेब , श्री . वसंत परदेशी , मा.अपर पोलीस अधिक्षक श्री विजय चव्हाण , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.यशवंत केडगे याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गणेश कोथळकर , पोहेकॉ माणीक चव्हाण ब.नं ५४९ , पोहेकॉ रविद्र कातखेडे ब नं . ७४७ , पोकॉ रामेश्वर राउत ब नं ०५ , पोलीस स्टेशन जउळका येथील पोहेकॉ ज्ञानेश्वर राठोड ब नं ७६४ , पोकॉ महेद्र दाभाडे ब नं ८ ९ ३ , महीला होमगार्ड गंगासागर मोरे ब नं ३१४ , चालक पोहेकॉ निरंजय वानखेडे ब नं ६७८ यांनी केली असुन सदरचा तपास सपोनी अजिनाथ मोरे पोलीस स्टेशन जउळका , पोउपनि राजेश पंडीत , व पोहेकॉ ज्ञानेश्वर राठोड ब नं . ७६४ हे करीत आहेत .
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206