धक्कादायक, वयोवृद्ध महिलेचा गळा कापून हत्येचा प्रयत्न
Shocking, attempted murder by cutting the throat of an elderly woman
X
धक्कादायक, वयोवृद्ध महिलेचा गळा कापून हत्येचा प्रयत्न
पुसद प्रतिनिधी राजेश ढोले
महागाव: तालुक्यातील घोन्सरा (मोहदी) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोन्सरा येथे राहणार्या ८० वर्षीय वयोवृद्ध महिलेची हत्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे,
घोन्सरा (मोहदी) येथे राहणार्या वयोवृद्ध महिला चावळीबाई सुखा चव्हाण ही एकटीच राहत होती. सोमवार दिनांक ११/ एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजता चावळीबाई सुखा चव्हाण यांच्या घरामध्ये काही अज्ञात व्यक्तीनी प्रवेश केला. त्यांनी चावळीबाई च्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या मध्ये चावळीबाई च्या गळ्यावर गंभीर दुखापत झाली असून सुदैवाने प्राण बचावले. चावळीबाई याना उपचारा करीता पुसद येथील रुंगालयात दाखल करण्यात आले. अंगावरील ८० तोळे वजनाचे चांदीचे दागिने चोरी करुन मारेकरी पळून गेले. गुन्ह्याची नोंद ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे करण्यात आली. या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध सुरु आहे. चावळीबाई यांची चोरीच्या उद्देशाने हत्या करण्याचा प्रयत्न केला असवा. असा अंदाज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि. मोतीराम बोडके यांनी व्यक्त केला. पुढील तपास सुरू आहे.