बहुचर्चित छोटू हत्याकांडातील सातव्या आरोपीला ८ महिन्यानंतर अटक!
Seventh accused in much talked about Chhotu murder arrested after 8 months!
Xमृतक सय्यद मोबीनोद्दीन उर्फ छोटू
बहुचर्चित छोटू हत्याकांडातील सातव्या आरोपीला ८ महिन्यानंतर अटक!
राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
पुसद येथे राहणाऱ्या सय्यद मोबीनोद्दीन उर्फ छोटूच्या हत्याकांडाने संपूर्ण तालुका हादरला होता.हत्याकांडाती आठ आरोपी पैकी सातव्या आरोपीला वसंत नगर पोलिसांना ८ महिन्यानंतर पकडण्यात अखेर यश मिळाले आहे.
इरफान खान उर्फ बंडू सलीम खान रा.शादी खान वसंत नगर असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणाऱ्या युवक सय्यद मोबीनोद्दीन सय्यद इलियासउद्दिन खतीब उर्फ छोटूची जुन्या वादाच्या कारणावरून दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी मेडिकेअर हॉस्पिटच्या माघे कृष्णा कार्तिकी नगर येथे खुल्या मैदानात रात्री ९ वाजताच्या दरम्यान ८ जणांनी मिळून धारदार शास्त्राने एकूण २८ वार करून निर्घृणपणे हत्या करून पसार झाले होते. याप्रकरणी वसंत नगर पोलीस ठाण्यात मृतकचे भाऊ सय्यद मोमीनोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. हत्याकांडातील दोन आरोपींना घटनेचा रात्रीच अटक करण्यात आले हते तर मुख्य आरोपी शेख मुख्तार मुलतानीसह इतर सर्व आरोपी पसार झाले होते. वसंत नगर पोलीस आरोपींचे शोधात असताना घटनेच्या तीन महिन्यानंतर गोपीनिये माहितीवरून पोलिसांनी मुंबईच्या नालासोपार येथुन शेख अकिल शेख शकील ला अटक केली होती तर अकोला येथून शेख आसिफ शेख उस्मान ला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले तर मुख्य आरोपी शेख मुख्तार ला पकडण्यात पोलिसांना यश मिळालेच नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्य आरोपी शेख मुख्तार आणि अवेस उर्फ टीड्डा या दोघांनी कोर्टात येऊन आत्मसमर्पण केले होते.
छोटू हत्याकांडातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असतानाच पोलिसांना घटनेचा ८ महिन्यानंतर गोपिनिये माहिती मिळाली की सातवा आरोपी इरफान खान उर्फ बंडू सलीम खान राहणार शादी खान वसंत नगर हा आरोपी पुसदला आला आहे. त्या गोपीनिये माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. या हत्याकांडातील आतापर्यंत सात आरोपी अटक झाली असून एक आरोपी इमरान खान अद्यापही फरार आहे. त्याच्या शोध वसंत नगर पोलिसांकडून घेतला जात आहे.