Home > Crime news > युवकास टाॅय गण ने मारून जखमी केल्याच्या वार्तेने शहरात खळबळ

युवकास टाॅय गण ने मारून जखमी केल्याच्या वार्तेने शहरात खळबळ

Sensation spread in the city over the news that a youth was killed and injured by a gang

युवकास टाॅय गण ने मारून जखमी केल्याच्या वार्तेने शहरात खळबळ
X
हिंगणघाट प्रतिनिधी, मो . ईकबाल ,दि.१४

स्थानिक संत चोखोबा वार्ड येथिल रहिवासी युवकास गोळी मारून जखमी केल्याची अफवा पसरली असून शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

जखमी युवकाची मोहन ऊर्फ अज्जु भुसारी अशी ओळख असून काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांसह भुषण देवतळे याने सदर युवकाच्या कानशीलात मारहाण करीत जखमी केले.

सदर घटना घडल्यानंतर जखमी युवकास आरोपींनी अपहृत केल्याची अफवा शहरात पसरली, याप्रकरणी जखमी युवकाचे वडील प्रकाश नारायण भुसारी यांनी आज दि.१४ रोजी पोलिसांत तक्रार केली.

सदर घटना आपसी वादातुन घडली असल्याची माहिती असून पोलिसांनी आरोपी शोध घेतला आहे.पोलिसांनी सदर घटनेतील बंदूक ही टॉयगन असल्याचे सांगितले तसेच गोळी चालली असल्याची अफवा पसरली असल्याचे सांगण्यात आले.भांडणाचेवेळी टॉयगनने आरोपी सदर युवकावर हल्ला केल्याने त्याचे कानाला मार लागला आहे.

पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून फिर्यादिसुद्धा पोलिसांच्या संपर्कात आहे.

दरम्यान पोलिस अधिक्षक काही कामाने शहरात आले असता सदर घटनेची त्यांनीसुद्धा माहिती जाणून घेतली.सदरकार्यवाही प्रशांत होळकर पोलीस अधिकारी वर्धा , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम , ठाणेदार संपत चव्हान , पो.उपनिरीक्षक प्रशांत पाठनकर, पो.उपनिरीशक अमोल लगड गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा शेखर डोंगरे, पो.हवा.विवेक बनसोडे , प्रशांतभाईमारे पुढील तपास करीत आहेत.

Updated : 2021-07-14T19:48:04+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top