Home > Crime news > बलत्कार च्या गुन्हयातील आरोपी कडुन चोरीच्या दोन मोटरसायकल सायकल जब्त

बलत्कार च्या गुन्हयातील आरोपी कडुन चोरीच्या दोन मोटरसायकल सायकल जब्त

Seized two stolen motorcycle bicycles from the accused in the crime of rape

बलत्कार च्या गुन्हयातील आरोपी कडुन चोरीच्या दोन मोटरसायकल सायकल जब्त
X_________________________

इकबाल पहेलवान. म- मराठी

९९२३४५१८४१.

_________________________. . हिंगणघाट/प्रतिनिधी ,दि.३

तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेलाला लग्नाचे आमिष दाखवून देत आरोपिने वारंवार बलात्कार केल्याची घटना पोलिसांत नोंद

झाली असून सदर प्रकरणी आरोपी विशाल उर्फ वांढुर वसंत उरवते(१९) रा.संत कबीर वार्ड याचेवरती अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरुन बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा नोंद करीत अटक केली.

या दरम्यान आरोपीने अनेक गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेल्या दोन दुचाकीसह त्याला हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर घरफोडी,मोटरसायकल चोरीचे गुन्हे दर्ज आहेत,उपरोक्त आरोपीने यवतमाळ,

वरोरा,नागपुर,बुटिबोरी इत्यादि ठिकाणी घरफोडी तर हिंगणघाट पांढरकवड़ा येथून दोन पल्सर दुचाकी वाहनचोरी केली आहे.

जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेने आपल्या आईसह हिंगणघाट पोलिसांत काल दि.२ रोजी तक्रार नोंद केली.

पिडितेचे कुटुंब घरी नसल्याचे पाहुन आरोपीने तिचेवर अनेकदा बळजबरी केली परंतु हे सर्व असह्य झाल्याने पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला,अखेर पीडितेने घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दाखल केल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपिचा शोध घेत त्याला जेरबंद केले.

सदर प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पपीन रामटेके,डीबी पथकाचे पोहवा शेखर डोंगरे,नापोशी निलेश तेलरान्धे,सचिन घेवन्दे,विशाल बंगाले,पोशी सचिन भारशंकर तसेच डीबी पथकाचे विवेक बंसोड़ सुहास चादोंरे यांनी कारवाई केली.

Updated : 3 Jun 2021 11:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top