Home > Crime news > खोदकामात मिळालेले सोने कमी किंमतीत देतो म्हणुन दरोडा टाकणाऱ्या टोळीस अटक पो.स्टे. महागांव व स्थानिक गुन्हे शाखा ची संयुक्त कामगीरी

खोदकामात मिळालेले सोने कमी किंमतीत देतो म्हणुन दरोडा टाकणाऱ्या टोळीस अटक पो.स्टे. महागांव व स्थानिक गुन्हे शाखा ची संयुक्त कामगीरी

Robbery gang arrested for giving gold found in mining at low price. Joint work of Mahagaon and local crime branch

खोदकामात मिळालेले सोने कमी किंमतीत देतो म्हणुन दरोडा टाकणाऱ्या टोळीस अटक पो.स्टे. महागांव व स्थानिक गुन्हे शाखा ची संयुक्त कामगीरी
X

दिनांक २३/१२/२०२२ रोजी फिर्यादी नामे सुरेंद्र प्रकाशराव गावंडे वय ३८ वर्ष व्यवसाय सराफा रा. आणी जि यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन महागांव येथे तक्रार दिली की. यातील फिर्यादी व त्यांचे मित्र यांना ०९ अनोळखी आरोपी यांनी मोबाईल फोनव्दारे संपर्क करुन त्यांचे कडे खोदकामात मिळालेली सोन्याचे नाणी आहेत, पाहीजे असल्यास कमी भावामध्ये देतो, असे आमीष दाखवुन व दोन खऱ्या सोन्याची नाणी दाखवले तसेच इतर दिड किलो नाणी ही पिशवी मध्ये ठेवलेले विक्री करण्याचा २० लाख रुपयांमध्ये सौदा केला व फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादी व त्यांचे मित्र यांना २० लाख रुपये नगदी घेवुन नॅशनल हायवे रोड वरील नांदगव्हाण शिवारात बोलावुन त्यांना मारहान करुन त्यांचे जवळील २० लाख रुपये नगदी जबरीने हिसकावून नेले. अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन पो.स्टे. महागांव येथे अपराध क्रमांक ७६६ / २०२२ कलम ४२०, ३९५ भादवि नुसार नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयांची मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गंभीरतेने दखल घेवुन ठाणेदार, पोलीस स्टेशन महागांव यांनी स्वतः तपास करण्याचे आदेशीत केले व ठाणेदार महागांव यांना स्वतः तपास करण्याचे आदेशीत केले ठाणेदार महांगांव यांनी तपास हाती घेवुन अथक परिश्रम करून अल्पावधीत आरोपीतांची नावे निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणला.

सदर प्रकरणात ठाणेदार पो.स्टे. महागांव व स्थागुशाचे पथकांनी मागील तीन ते चार दिवसात तब्बल २००० किमी प्रवास करून महागांव, कळमनुरी, नांदेड, औरंगाबाद ई. ठिकाणावरुन ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस करुन त्यांचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने चार आरोपीतांना दिनांक ०२/०१/२०२३ रोजी २२:०० वा चे सुमारास अटक करण्यात आली असुन आरोपीतांकडुन आज पावेतो गुन्हयातील सहा लाख बिस हजार रुपये नगदी हस्तगत करण्यात आले असुन आरोपीतांना मा. न्यायालयाचे समक्ष हजर करुन आरोपीतांचा दिनांक ०६/०९/२०२३ रोजी पावेतो तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.

नमुद गुन्हयातील उर्वरीत आरोपीचे शोधार्थ दोन पथके कार्यरत असुन उर्वरीत आरोपीतांचा शोध घेवुन अटक करुन गुन्हयातील रक्कम हस्तगत करण्याची कारवाई सुरु आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदिप पाडवी यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, सपोनि संजय खंडारे ठाणेदार पो.स्टे. महागांव, सपोनि अमोल सांगळे स्थागुशा, सहा.फौ. नारायण पवार, पोहवा मुन्ना आडे, नापोशी वसीम शेख, संतोष जाधव सर्व पो.स्टे. महागांव तसेच पोहवा सुभाष जाधव, नापोशी पंकज पातुरकर, पोशी ताज मोहम्मद चालक दिगांबर गिते सर्व स्थागुशा व सायबर सेल ने केलेल्या सहकार्याने नमुद पथकांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Updated : 3 Jan 2023 2:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top