रेशन माफिया शेख रहीमची झाली कारागृहात रवानगी
पत्रकाराला धमकाविल्याचे प्रकरण
X
यवतमाळ : रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारे नेटवर्क 'लोकमत'मध्ये वृत्ताच्या माध्यमातून उघड करण्यात आले. यातील सूत्रधार शेख रहीम शेख करीम याने मंगळवारी फोनवरून 'लोकमत' प्रतिनिधीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
शेख रहीम शेख करीम रा. स्वस्तीकनगर वर्धा याला अटक करून सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण भाकडे यांनी बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शेख रहीम याची कारागृहात रवानगी केली. शेख रहीम याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहे. २०१८ मध्ये कळंब पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्ह शेख रहीम याच्या गोदामात रेशनचा २०५ पोते तांदूळ मिळाला होता. त्यानंतर काही दिवस शेख रहीम हा यवतमाळकडे फिरकला नाही, तो राळेगाव, पांढरकवडा येथील तांदूळ घेवून वर्धेत साठवत होता. आता त्याने पुन्हा कळंबमध्ये आपले बस्तान बसविले आहे. इतकेच नव्हे तर राईस मीलचे बांधकामही सुरू केले आहे. त्याचा काेटी रुपयांचा प्रोजेक्ट असून त्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने तो निर्ढावला आहे. रेशन माफिया शेख रहीम याचा करवीता धनी कोण याचाही शोध पोलीस घेत आहे. दाखल गुन्ह्यांची कुंडली गोळा करून कठोर कारवाई प्रस्तावित आहे.