मंगरुळपीर तालुक्यात ठिकठीकाणी अवैध धंद्यावर धाड,एसडीपीओ पथकाची धडाकेबाज कारवाई
Raids on illegal businesses in Mangrulpir taluka, bold action by SDPO team
X
(फुलचंद भगत)
वाशिम:-दिनांक ३०/०८/२०२२ रोजी मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक वाशीम, मा. श्री. गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक वाशीम यांचे मार्गदर्शनाखाली यशवंत केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर यांचे पथकातील पोलीस अंमलदार पोउपनि रविकिरण खंदारे, सपोउपनि माणिक चव्हाण,पोहेकॉ रविंद्र कातखेडे, पोकॉ पोकॉ रामेश्वर राऊत, मोहन जपसरे, मंगेश गादेकर, नरुटे हे मंगरुळपीर परिसरात प्रोव्हीबीशन व जुगार रेड करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना १८.०० वाजताचे दरम्यान गुप्त बातमीदार मार्फत ग्रामीण रुग्णालय रोड महात्मा फुले चौक येथे हिरो मोटर सायकल क्रमांक एमएम-३७- वाय- ३४८३ वर अवैध देशी दारु वाहतूक करणारो इसम नामे नागेश पाडुरंग गंगावणे वय २७ वर्षे रा. देपूळ ता.जि. वाशीम याचे कडून २०० देशी दारुचे कॉटर किंमत १२०००/- रुपये व मोटर सायकल किंमत ४००००/- रुपये असा एकुण ५२०००/- रुपयाचा माल जप्त करुन ताब्यात घेतला नमुद आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे कलम ६५ ई, महाराष्ट्र दारुबंदी कायदया प्रमाणे गुन्हा नोंद करण्यता आला आहे.तसेच पपकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ग्राम चिखली झोले बाबा येथे ०४ इसम एक्का बादशाह जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदर आरोपी कडून रोख रक्कम व जुगार साहीत्य जप्त करण्यात आले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206