Home > Crime news > वडगाव परिसरातील मटका अड्ड‌्यावर धाड, 8 जणांना अटक

वडगाव परिसरातील मटका अड्ड‌्यावर धाड, 8 जणांना अटक

Raid on Matka hideout in Vadgaon area, 8 people arrested

वडगाव परिसरातील मटका अड्ड‌्यावर धाड, 8 जणांना अटक
X

यवतमाळ- मटका अड्ड‌यावर पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेत ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवार, दि. ८ ऑगस्टला शहरातील वडगाव परिसरातील पंचशील नगरात करण्यात आली. विलास चव्हाण, पंचशील साबळे, मिथून यादव, अभिजीत बडोद, सागर बदोड, गोपाल लांजेवार, लक्ष्मण अतकरे, हेमंत राठोड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहे. वडगाव परिसरात असलेल्या पंचशील नगरात मोठ्या प्रमाणात मटका जुगार सुरू होता. याबाबतची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. यावेळी आठ जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

Updated : 9 Aug 2022 2:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top