Home > Crime news > मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे वरलीमटक्यावर तर रिसोड येथे अवैध गुटखाविक्रीवर धाड

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे वरलीमटक्यावर तर रिसोड येथे अवैध गुटखाविक्रीवर धाड

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंदयाविरूध्द धडाकेबाज कारवाई

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे वरलीमटक्यावर तर रिसोड येथे अवैध गुटखाविक्रीवर धाड
X

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपकम हाती घेतले. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता,जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहाण्याकरीता वेळोवेळी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम,शस्त्र अधिनियग,दारुबंदी अधिनियम,जुगार, अवैध गुटखा प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना कायदयाचा बडगा दाखविला आहे.


वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर कारवाईचे सत्र सुरु असताना, संपुर्ण जिल्हयात मा.पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह व अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात अवैध धंदयांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता पोलीस निरीक्षक एस.एम.जाधव, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे अधिपत्याखालील अधिकारी/अमंलदार यांचे पथकाची वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर कारवाईचे सत्र सुरु असतांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून कार्यवाही करण्यात आली.

१) दिनांक २९/०१/२०२२ रोजी पोस्टे मंगरूळपीर हददीतील ग्राम शेलुबाजार येथे जावून दुरुन खात्री करून दोन पंचासमक्ष जुगार रेड केली असता सदर ठिकाणी वरली मटक्याच्या आकडयावर पैश्याची बांजी लावून हारजितचा जुगार खेळणारे एकुण १२ इसमांना पकडण्यात आले. त्यांचेकडुन वरली मटकाचे सट्टापट्टीचे साहित्यासह एकुण नगदी ३५३१०/-रुपये व १० मोटार सायकली किं. ३६००००/- व ९ मोबाईल किं.४००००/- व इतर साहित्यासह असा एकुण ४,३५,३१०/- रुपयाचा माल मिळून आल्याने घटनास्थळी सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करण्यात आला. सदरची कार्यवाही सपोनि अतुल मोहनकर,पोउपनि शब्बीर पठाण, पोहवा गजानन अवगळे, दिपक सोनोवणे, मिलींद गायकवाड, पोना अमोल इंगोले,प्रशांत राजगुरू,राजेश गिरी,अश्विन जाधव,प्रविण राउत, पोकॉ संतोष शेणकुडे यांनी केली.

२) दिनांक २८/०१/२०२२ रोजी रात्री उशिरा रिसोड शहरात मिळालेल्या गुप्त बातमीवरून रेड केली असता महाराष्ट्र शासनाकडुन प्रतिबंधीत असलेला गुटखा ज्या मध्ये विमल गुटखा,नजर गुटखा,माझी गुटखा व आर जे गुटखा असा एकुण ८४,४५०/- रूपयाचा मुददेमाल मिळुन आल्याने ते दोन पंचासमक्ष जप्त करून सपोनि प्रमोद इंगळे व पथकाने कायदेशीर कार्यवाही केली आहे.

उपरोक्त कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक श्री गोरख सुरेश भामरे,यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री एस.एम.जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथकाने केली आहे.

वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की, कोणालाही अवैध धंदयाबाबतची माहिती असल्यास त्यांनी अपर पोलीस अधीक्षक वाशिम यांना समक्ष भेटुन अथवा फोनवर दयावी. माहिती देणा-याबाबत पुर्णपणे गोपनियता ठेवण्यात येईल.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 29 Jan 2022 6:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top