महाविद्यालयातील गोळीबार व चाकू हल्ल्याने पुसद शहर हादरले!
हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी.
X
महाविद्यालयातील गोळीबार व चाकू हल्ल्याने पुसद शहर हादरले!
हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी.
पुसद प्रतिनिधी राजेश ढोले
पुसद शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे मागील हत्याकांड व गोळीबार प्रकरण बघता एकापाठोपाठ, हत्याकांड गोळीबार असे एका मागे एक गंभीर गुन्हे घडत असल्याने पुसद शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे पुसद शहरातील गुणवंतराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक 29 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की पुसद शहरातील नामवंत विद्यालय गुणवंतराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात आज दुपारी दोन वाजता च्या सुमारास एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून चाकू हल्ला केला त्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला आहे सचिन हराळ वय 32 असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे चार हल्लेखोरांनी गोळीबार करून चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले व हलेखोर पसार झाले, सचिन हराळ हा गुणवंतराव देशमुख महाविद्यालय येथे पत्नीला घेण्यासाठी आला होता परत जात असताना त्याच्यावर 4 हल्लेखोरांनी गोळीबार केला त्यामध्ये सचिन गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
गंभीर दुखापत असल्याने त्याला इथून नांदेड येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक वृत्त आहे अधिक तपास पोलिस करीत आहेत.