गोळीबार करून खुनाच्या प्रयत्नाचे पो.स्टे. पुसद शहर येथील गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात
Po.St. of attempted murder by firing. The accused who was absconding in the crime in Pusad city was taken into custody by the team of the local crime branch
X
दिनांक १५/११/२०२२ रोजी पो.स्टे. पुसद शहर हद्दीत शिवाजी वार्ड पुसद येथील विशाल घाटे यांचेवर काही आरोपीतांनी गोळीबार करून जिव घेणा हमला केला होता. प्रकरणात अक्षय विजय घाटे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पो.स्टे. पुसद शहर येथे आरोपी सचिन हराळ, किती रावल, राजेश पवार, सौरभ मडके, बजरंग काळे, शाकीर शेख, करन मेकवान, अमन खान यांचे विरुध्द अप क्रमांक ७२५/२०२२ कलम ३०७,१४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), भादवि सहकलम ३ (२) (V) अ.जा.ज.अ.प्र.का., २,२५,२७ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हयाचे तपास अधिकारी सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा, प्रभार पुसद श्री. आदीत्य मिरखेलकर यांनी किती रावल, शाकीर शेख व सौरभ मडके यांना तिन आरोपीतांना तात्काळ ताब्यात घेवून अटक केली होती. गुन्हयातील इतर आरोपी हे पसार असल्याने आरोपींचा तात्काळ शोध घेवून अटक कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना निदेश दिले होते.
गुन्हयातील फरार आरोपींचे शोधा करीता पो.स्टे. पुसद शहर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके आरोपींचे मागावर असतांना स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गुन्हयातील फरार आरोपी अमनखान पठाण हा वाशीम जिल्हयात असल्याची गोपणीय खबर प्राप्त झाली त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिनांक २०/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वाशीम येथील पथकासह संयुक्त कारवाई करुन त्यास पो.स्टे. आसेगांव बाजार जि. वाशीम हददीतील ग्राम रुई येथुन ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. पुसद शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री.. पियुश जगताप, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा प्रभार पुसद श्री. आदीत्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदीप परदेशी पो. नि. स्थागुशा, पोउपनि सागर भारस्कर, पोहवा/अजय डोळे पोना/ पंकज पातुरकर, सुधीर पिदुरकर, पोशी मो. ताज सर्व स्थागुशा यवतमाळ, स्थानिक गुन्हे शाखा, वाशीम येथील पथक, व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथील अधिकारी/ अंलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.