Home > Crime news > नागरिकांची सायबर गुन्हेगारांकडुन फसवणुक होण्याची शक्यता

नागरिकांची सायबर गुन्हेगारांकडुन फसवणुक होण्याची शक्यता

सोशल मिडीयाचा वापर सतर्कतेने करण्याबाबत पोलीसांकडुन आवाहन

नागरिकांची सायबर गुन्हेगारांकडुन फसवणुक होण्याची शक्यता
X

नागरिकांची सायबर गुन्हेगारांकडुन फसवणुक होण्याची शक्यता

सोशल मिडीयाचा वापर सतर्कतेने करण्याबाबत पोलीसांकडुन आवाहन

(फुलचंद भगत)

वाशिम:-सध्याच्या इंटरनेट युगामध्ये दैनंदिन जीवनातील सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत. इंटरनेटमुळे नागरिकांनी घरीबसल्या सर्व सोयीसुविधा घरपोच होत आहेत. याच संधीचा फायदा घेउन सायबर गुन्हेगार इंटरनेटवर वेगवेगळया पध्दती वापरून नागरिकांची फसवणुक करत आहेत. सायबर गुन्हेगार मेसेजेसव्दारे विविध प्रलोभने / गिफ्ट कार्ड अमिष दाखवुन अश्लिल व्हिडीओज बनवतात व त्याव्दारे ब्लॅकमेल करून पैसे उकळतात.


वाशिम पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा. यांनी सायबर गुन्हेगारी आळा घालण्याकरिता विशेष मोहीम हाती घेतलेली असुन, त्यांनी वाशिम जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये आजपावेतो घडलेल्या सायबर गुन्हयांचे पुढीलप्रमाणे बारकाईने विश्लेषण केलेले आहे. जिल्हयात मागील २ वर्षात २५९ सायबर तक्रारी प्राप्त आहेत, त्यामध्ये ग्रामीण भागांचे तुलनेत वाशिम शहर – ५८, कारंजा शहर - ३८, मंगरूळपीर - ३५ व मानोरा - ३४ या चार शहरांमध्ये १६५ तक्रारी आहेत.त्यामध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे १११ तक्रारी व सोशल मिडीया जसे की, फेसबुक, व्हॉटस्अॅप, इंस्टाग्राम, इ. व्दारे ७१ तक्रारी आहेत. तसेच सायबर फिशींग फसवणुकीचे कॉल्सव्दारे-३५, युपीआय फसवणुक-३२, आयडेंटीटी थेफ्ट – २१, सायबर स्टॉकींग / अश्लिल मॅसेजेस - १५ या ४ मुख्य हेडअंतर्गत १०४ तक्रारी आहेत. वाशिम जिल्हयात झालेली सायबर गुन्हेगारीचे प्रमाण हे जानेवारी ते जुन महीन्यांमध्ये व शनिवार, सोमवार, मंगळवार या दिवशी व दुपारी १२ ते ५ दरम्यान, मध्यरात्री १२ वा. जास्त असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. सायबर गुन्हेगारीतुन मुख्यत: बॅक खात्याची माहीती घेउन इंटरनेट बँकींग अॅक्टीव करून ग्राहकाचे खात्यातुन रक्कम ई वॉलेटमध्ये हस्तांतरण करणे व आर्थिक फसवणुक करणे याकडे सायबर गुन्हेगारांचा जास्त कल आढळतो.वाशिम जिल्हयातील नागरिकांना पोलीस दलाकडुन आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, सायबर स्टॉकिंग, मॉफिंग, सायबर बुलींग, सायबर ग्रुमिंग, ऑनलाईन फ्रॉड व सोशल मिडीया बनावट खाते ईत्यादी सारखे गुन्हे स्वतः सोबत घडु देउ नये याकरिता खबरदारी घ्यावी. कोणत्याही स्थितीत नागरीकांनी स्वत:ची आर्थीक फसवणुक होवु नये यासाठी आपली बॅकविषयक गोपनिय माहीती कोणासही देवु नये. उदा. UPI PIN, ATM PIN, Bank Details, etc. तसेच कुणाचे सांगण्यावरून कुठलेही अनोळखी अॅप सुदधा फोन मध्ये डाउनलोड करू नये.असा कोणताही प्रकार आपल्यासोबत घडल्यास त्याबाबतची तात्काळ माहीती केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग (एन सी सी आर) पोर्टलवर व टोल फ्री क्र. १९३० वर तक्रार नोंद करावी. तसेच वाशिम सायबर सेल येथे सपोनि. संदीप नरसाळे मो. क्र. ८७७९६२९७६६ यांना संपर्क साधावा.

गहाळ / हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी वाशिम सायबर यांच्याकडे CEIR हे पोर्टल कार्यान्वित असुन त्याव्दारे वाशिम जिल्हयातील हरविलेल्या ८१५ मोबाईल्स पैकी ३५० मोबाईल्स फोनमालकांना परत करण्यात आलेले आहेत व १०० मोबाईल्स जप्त करून ताब्यात देण्यात येत आहेत. तरी वाशिम जिल्हयातील नागरीकांनी आपल्या हरविलेल्या मोबाईल चा शोध घेण्यासाठी www.ceir.gov.in या संकेत स्थळाचा वापर करावा. तसेच वाशिम जिल्हयातील विविध शाळा, महाविद्यालये किंवा इतर व्यावसायिक संस्था यांना सायबर गुन्हेगारीबाबत त्यांचे मागणीनुसार मोफत जनजागृती कार्यक्रम शिबीर आयोजन सायबर पोलीस विभागाकडुन करण्यात येईल असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी याद्वारे केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 7 July 2022 3:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top