Home > Crime news > पोलीस स्टेशन, वाशिम शहर डि.बी. पथकाची कारवाई

पोलीस स्टेशन, वाशिम शहर डि.बी. पथकाची कारवाई

मोटारसायकल चोरटयाला अटक व त्याच्याकडून ०४ मोटारसायकली, किंमत रू. २,१०,००० / रू. हस्तगत व एकूण ०४ गुन्हे उघड

पोलीस स्टेशन, वाशिम शहर डि.बी. पथकाची कारवाई
X

वाशिम:-दि. २७/०९/२०२२ रोजी फिर्यादी श्री. विनोद भिकाजी राउत, वय ३२ वर्ष, धंदा-नोकरी, रा.कळंबा महाली, ता.जि. वाशिम यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली होती की,त्यांनी त्यांची होंडा शाईन कंपनीची एम.एच. ३७ एस. ६९४६ या क्रमांकाची मोटारसायकल दि. २५/०९/२०२२ रोजी १८:१० वाजताच्या सुमारास महात्मा फूले भाजी मार्केट, पाटणी चौक, वाशिम येथे पार्क केली व ते भाजीपाला घेण्यासाठी गेले. त्यानंतर फिर्यादी हे १८:३० वाजताच्या दरम्यान त्यांनी ठेवलेल्या मोटारसायकल जवळ आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल त्यांनी लावलेल्या ठिकाणी मिळून न आल्याने त्यांच्या लक्षात आले की, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची मोटारसायकल चोरून नेली आहे. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे दिलेल्या रिपोर्ट वरून अप. क.७४५/२०२२, कलम ३७९ भा.दं.वि. अन्वये दाखल करण्यात आला.

त्यानंतर डिबी पथक, वाशिम शहर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून व सि.सी.टि.व्ही. फूटेजच्या आधारे इसम नामे समाधान पायरू कांबळे, वय २८ वर्षे, रा. तामसाळा, ता.जि. वाशिम यास ताब्यात घेउन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वाशिम शहरातून एकूण ०४ मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर नमूद आरोपीस अटक करून त्याच्या कडून एकूण २,१०,०००/- रू.

किंमतीच्या खालील ०४ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

१. एक होंडा शाईन कंपनीची एम. एच. ३७ एस. ६९४६ या क्रमांकाची मोटारसायकल, किंमत ६०,००० /- रू.

२. एक हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची एम.एच. ३७ ए.सी. या क्रमांकाची मोटारसायकल, किंमत ६०,०००/- रू.

३. एक हिरो पॅशन एक्स. प्रो कंपनीची एम. एच. ३७ एम. ९६३० क्रमांकाची मोटारसायकल, किंमत ५०,०००/- रू.

४. एक बजाज प्लॅटिना कंपनीची एम. एच. ३७ डी. ६१९९ या क्रमांकाची क्रमांकाची मोटारसायकल, किंमत ४०,०००/- रू.आरोपी नामे समाधान पायरू कांबळे, वय २८ वर्षे, रा. तामसाळा, ता.जि. वाशिम याच्या कडून खालील प्रमाणे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

१) पो.स्टे. वाशिम शहर अप.क. ७४५/२०२२, कलम ३७९ भा.दं.वि.

२) पो.स्टे. वाशिम शहर अप.क. ७३७/२०२२, कलम ३७९ भा.दं.वि.

३) पो.स्टे. वाशिम शहर अप.क. ७१५/२०२२, कलम ३७९ भा.दं.वि.

४) पो.स्टे. वाशिम शहर अप.क. ७५२/२०२२, कलम ३७९ भा.दं.वि. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो., अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी साो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. रफीक शेख यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे, पो.ह.क. ३४७/ लालमणी श्रीवास्तव, स.पो.उप.नि. ४९६/मारोती भवाळ, पो.ह.क. ५१५/ मंगेश मालवे, पो.ना.क. ८५६/ रामकृष्ण नागरे, पो.ना.क. २१०/ ज्ञानदेव मात्रे, पो.शि.क. २४३/विठ्ठल महाले व पो.शि.क. ३०३ / संदीप वाकुडकर यांनी पार पाडली.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 29 Sep 2022 10:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top