अवैध गुटखा व गावठी हातभट्टीच्या दारु अड्य्यावर पोलिसांचा छापा
मंगरुळपीर तालुक्यात पोलिसांची धमाकेदार कारवाई
X
(फुलचंद भगत)
वाशिम:-दि.२० आॅगष्ट रोजीमंगरुळपीर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांचे पथकाने गुप्त बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या खबर वर पो.स्टे. मंगरुळपीर हद्दीतील ग्राम वनोजा येथे आरोपी नामे शुभम संतोष गावंडे वय 26 वर्ष रा. वनोजा याचे शुभम किराणा दुकानातुन 1) 2700 रु चा प्रीमियम नजर गुटखा 18 नग पुढे प्रत्येकी किंमत दीडशे रुपये 2 ) 3159 रु चा केसर युक्त विमल पान मसाला 21 नग पुड्या प्रत्येकी किंमत 150 रुपये 3) 660 रु चा विमल तंबाखू पाऊच 22 नग प्रत्येकी कीं 30 रुपये 4 )120 रु चा वाह तंबाखूचे आठ नग पुड्या प्रत्येकी 15 रुपये असा एकूण 6630/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
2)तसेच ग्राम वनोजा येथे आरोपी विष्णू कणिराम राठोड याच्याकडून त्याचे राहते घरात 15 लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत अंदाजे 1500/- रु जप्त करण्यात आली 3) तसेच आरोपी शरद श्रीराम पवार रा वनोजा यांचे जवळून त्याचे राहते घरात 90ml देशी दारूचे 48 क्वार्टर किंमत अंदाजे 1680/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी विरुध्द पो.स्टे. मंगरुळपीर येथे गुन्हा दाखल करुन कायदेशिर कार्यवाही करण्यात आली.सदरची कार्यवाही ही मा. बच्चन सिंह, (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, वाशिम मा. गोरख सुरेश भामरे (भा.पो.से.) अपर पोलीस अधीक्षक, वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने यशवंत र. केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर यांचे पथकातील पोउपनि अमोल गोरे, ए. एस. आय, मानिक चव्हाण ब. क्र. 459 पोलीस अंमलदार मोहन जपसरे ब. क्र. 1234 व राधेश्याम महल्ले ब. क्र.1169 एस.डी.पी. कार्यालय, मंगरुळपीर व पो.स्टे.मंगरुळपीर येथील स.पो.नि. मंजुषा मोरे पोलीस अमंलदार अमोल मुंदे ब. क्र. 867, संतोष मनवर ब. क्र. 189, ज्ञानेश्वर राठोड ब. क्र. 765, संदिप खडसे ब. क्र. 1098, मोहम्मद परसुवाले ब.क्र. 1374 व कव्हर ब. क्र. 1144 यांनी केली आहे.मा. मा. बच्चन सिंह, (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, वाशिम यांचे मार्गदर्शन व आदेशाने मागील चार दिवसापासुन उपविभाग मंगरुळपीर हदिदत आमचे कार्यालयीन पथकाकडुन व ऊपविभागातील पो.स्टे.चे पथकाकडुन सतत अवैध करणा-या विरुध्द 14 केसेस करुन 27020 /- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे. यापुढे ही अवैध धंदे करणा-यांवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206