सांसद दत्तक गावात पोलिसांची जुगार अड्यावर धाड,पाच जणांवर गुन्हे दाखल
१९१० रूपये जप्त,स्थागुशाची कारवाई
X
पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणानले
फुलचंद भगत
वाशिम:- जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने मंगरुळपीर तालुक्यातील सांसद दत्तक ग्राम सायखेडा या गावात जुगार अड्ड्यावर धाड टाकुन जुगार साहित्यासह १९१० रुपये जप्त करुन चौघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
वाशिम जिल्ह्याच्या पोलिस विभागाची धुरा हाती घेतल्यापासुन पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी अवैध धंदे काबूत आणले असुन गुन्हेगारांना वठणीवर आणले आहे.विविध सामाजिक ऊपक्रम राबवुन पोलिस विभागाची प्रतिमा जनमाणसात उंचावन्यासाठी सतत प्रयत्न केले तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठीही कसोशीने प्रयत्न केले आहे.पोलिसांना मीळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या आणी ऊपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे सापळा रचुन मंगरुळपीर तालुक्यातील सांसद दत्तक ग्राम असलेल्या सायखेडा या गावात जुगार अड्ड्यावर धाड टाकुन १९१० रुपये जप्त केले आणी सतिष भगत आणी इतर चौघांवर याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.या कारवाई पथकामध्ये सहाय्यक पोलिस ऊपनिरिक्षक नारायण जाधव, किशोर चिंचोळकर,अमोल इंगोले,पोलिस काॅन्सटेबल निलेश इंगळे,अश्वीन जाधव,प्रविण राऊत,संदिप डाखोरे यांनी मोलाची भुमिका बजावली.वाशिम जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरु असतील तर त्याविषयी तात्काळ पोलिस विभागाला कळवन्यात यावे असे आवाहन पोलिसांकडुन करन्यात आले आहे.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206