Home > Crime news > वाशिम येथे तलवारीसह धारधार शस्ञे जप्त,पोलिसविभागाची धडाकेबाज कारवाई

वाशिम येथे तलवारीसह धारधार शस्ञे जप्त,पोलिसविभागाची धडाकेबाज कारवाई

Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck

वाशिम येथे तलवारीसह धारधार शस्ञे जप्त,पोलिसविभागाची धडाकेबाज कारवाई
X

वाशिम:-मा, पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम श्री. वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारले पासून जिल्हयातील गुंड प्रवृत्तीच्या व अवैध धंदे करणा-या इसमांच्या मुसक्या आवळल्या आहेत व इतर अवैध कृत्त्यांना आळा घातला आहे.आज दि. २२/०७/२०२१ रोजी गंगु प्लॉट, कब्रस्तान समोर, वाशिम येथे एका इसमाजवळ तलवार असल्याची गोपनीय खब-याद्वारे माहिती मिळाली असता ठाणेदार पोलीस निरीक्षक धृवास बावनकर यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकासह सदर ठिकाणी जाउन छापा मारला व इसम नामे राजा उर्फ ख्वाजा मोईनोद्यीन खान सलामुद्यीन खान, वय २५ वर्ष, धंदा-मजुरी, रा. गंगू प्लॉट, कब्रस्तानच्या समोर, वाशिम याच्या घराची झडती घेउन त्याच्या घरातील बेडरूममधील पलंगाच्या खालून ०१ तलवार ०२ गुप्त्या, अशी एकूण ०३ हत्त्यारे जप्त केली असून त्याच्या विरोधात कलम ४,२५ भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक वसंत परदेशी सो. मा. अपर पोलीस अधिक्षक विजय चव्हाण सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यशवंत केडगे सो, यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस स्टेशन, वाशिम शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक धृवास बावणकर यांच्या नेतृत्वाखाली,डि.बी. पथकाचे सपोनि रमाकांत खंदारे, पो.उप.नि. संतोष जंजाळ, पोहेकॉ ३४७/लालमणी श्रीवास्तव, नापोकाँ ८५६/रामकृष्ण नागरे, पोकाँ २१० / ज्ञानदेव मात्रे, पोकाँ २४३/विठ्ठल महाले,पोकॉ ३०३/वाकुडकर यांनी पार पाडली असून सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ९६०/संजय आमटे हे करीत आहेत.तरी पोलीस स्टेशन वाशिम शहर तर्फे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले की,शहरामध्ये कोठेही अवैध धंदे किंवा अशा प्रकारचे कृत्त्य चालू असल्यास त्याची माहिती वाशिम शहर पोलीसांना द्यावी. अशी माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी सांगीतले.

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 22 July 2021 6:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top