Home > Crime news > पोलीसांच्या मारहाणीत एकजण ठार,संतप्त जमावाची पोलीस स्टेशनवर गोटमार

पोलीसांच्या मारहाणीत एकजण ठार,संतप्त जमावाची पोलीस स्टेशनवर गोटमार

Police in riot gear storm a rally on Friday, removing hundreds of protesters by truck

दारव्हा येथे पोलीसांच्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यु झाल्याने संतप्त जमावाने गोटमार केल्याची घटना आज मंगळवार दि.६ जुलैला ९.३० वाजता दरम्यान घडली असुन यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यासह नागरीकही जखमी झाल्याची घटना घडली आहे. सांयकाळी ७.३० वाजता दरम्यान पोलीसांनी तिन युवकांना पकडुन आणले नेमके कुठल्या गुन्हयात या युवकांना पोलीसांनी पकडले याबाबत नेमकी माहीती मिळु शकली नाही. परंतु शहरातिल रेल्वे स्टेशन परिसरातील हे युवक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीसांनी या तिनही युवकांना जबर मारहाण केल्याने यामधील एका युवकाचा मृत्यु झाल्याचे घटनास्थळावर बोलल्या जात होते. पोलीसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यु झाल्याने संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक केली असुन शहरात सध्या तणावपुर्ण वातावरण आहे. परीस्थीतीवर नियंत्रण मिळवीण्यासाठी अतिरीक्त कुमक बोलविण्यात आली आहे.
Updated : 2021-07-07T01:09:22+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top