Home > Crime news > प्रतिबंधित 'सुगंधी तंबाखू'वर पोलिसांची कारवाई ; १५ लाखांचा गुटखा जप्त

प्रतिबंधित 'सुगंधी तंबाखू'वर पोलिसांची कारवाई ; १५ लाखांचा गुटखा जप्त

Police action on banned 'fragrant tobacco'; Gutkha worth 15 lakhs seized

प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर पोलिसांची कारवाई ; १५ लाखांचा गुटखा जप्त
X

(फुलचंद भगत)

वाशिम:-नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले आहेत.


त्या पार्श्वभूमीवर काल दि.११.१०.२०२२ रोजी पो.स्टे.मालेगाव हद्दीत पो.स्टे.मालेगावचे पथक पेट्रोलिंग करत असतांना बायपासवरून एक कंटेनर क्र.PB-१३-AR-९४६३ वाशिमकडे जात असतांना त्यातून सुगंधित तंबाखूचा वास आल्याने थांबवून तपासणी केली. त्यावेळी त्या कंटेनरमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू ५३६ पोत्यांमध्ये भरलेला ज्याचे वजन अंदाजे १४,७६० किलो अंदाजे किंमत १४,७६,०००/-रुपये व तंबाखूजन्य पदार्थ बनविण्यासाठी उपयोगात येणारा लिक्विड पॅराफिन नावाचे रासायनिक द्रावण अंदाजे किंमत ८०,०००/-रुपये व कंटेनर अंदाजे किंमत २५ लाख रुपये असा एकूण ४० लाख ५६ हजारांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेतला. सदर चालकास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मुबारक अकबर, वय २६ वर्षे, रा.सुडाका, हरयाणा असे सांगितले. सदर मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.किरण वानखडे ठाणेदार पो.स्टे.मालेगाव, सपोनि.तानाजी गव्हाणे, परिविक्षाधीन पोउपनि.गंधे, ASI रवी सैबेवार, HC कैलास कोकाटे, प्रशांत वाढणकर, गजानन झगरे, PC अमोल पाटील व विठ्ठल शिंदे यांनी पार पाडली.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 12 Oct 2022 8:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top