पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई, गॅस कटरने घरफोडी करणा-या व ए.टी.एम.फोडणा-या आरोपींकडून रोख रक्कम ३,००,०००/-रू. हस्तगत
Po. In the action of Sta Washim city, cash amount of Rs. Acquired
X
वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह साहेब, वाशिम यांनी जिल्हयातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करून कायदेशिर कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कडक कारवाया सुरू आहेत.
फिर्यादी नामे डॉ. सचिन दशरथ कड, वय ४२ वर्ष, धंदा-डॉक्टर (वैद्यकिय व्यवसाय), रा.माउली हॉस्पीटल च्या वर, अकोला नाका, वाशिम यांनी दि. २७/१२/२०२१ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथे येउन दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. वाशिम शहर अप.क. १४४१ /२०२१, कलम ४५४,४५७,३८० भा.दं.वि. अन्वये नोंद करण्यात आला आहे.मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो. यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रफीक शेख यांनी सदर गुन्हयाच्या तपासाबाबत डि.बी. पथकास आदेश देउन रवाना केले असता डि.बी. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे देवानंद वसूदेव डाखोरे,वय २५ वर्ष, धंदा-शेती, रा. नारायण शिंदे यांच्या घराच्या शेजारी, भिलदूर्ग, ता. मालेगाव, जि.वाशिम यास त्याच्या राहते घरून ताब्यात घेउन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देउन त्याने सदरचा गुन्हा त्याच्या १) अजय रमेशराव शेंडे, वय ३२ वर्ष, रा. सहजपुर, ता.दौंड, जि. पुणे २) शिवाजी उत्तम गरड, वय २५ वर्ष, रा. करंजी, ता. मालेगाव, जि. वाशिम ३)ॠषिकेश काकासाहेब किर्तीके, वय २२ वर्ष, रा. देवधानोरा, ता.कळंब, जि. उस्मानाबाद ४) सुमित आबा वाघमारे, वय २३ वर्ष, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ५) संदीप दत्ता लहाने, वय २७ वर्ष, रा. करंजी. ता. मालेगाव, जि. वाशिम व ६) सचिन प्रल्हाद कांबळे, वय ३४ वर्ष, रा.पंचशिल नगर, वाशिम यांच्या सह केला असल्याचे सांगितले. १) अजय रमेशराव शेंडे, वय ३२ वर्ष,रा. सहजपुर, ता. दौंड, जि. पुणे २) शिवाजी उत्तम गरड, वय २५ वर्ष, रा. करंजी, ता. मालेगाव,जि. वाशिम ३) ऋषिकेश काकासाहेब किर्तीके, वय २२ वर्ष, रा. देवधानोरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद या आरोपींना यवत पोलीस स्टेशन, जि. पुणे यांनी अटक केली असल्याने त्यांना दि.१०/०२/२०२२ रोजी प्रोडयुस वॉरंटद्वारे दि. १०/०२/२०२२ रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून इतर आरोपी नामे सुमित आबा वाघमारे, वय २३ वर्ष, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि.ऊस्मानाबाद यास दि. १०/०२/२०२२२ रोजी त्याच्या राहते परिसरातून अटक करण्यात आली असून इतर आरोपी नामे संदीप दत्ता लहाने, वय २७ वर्ष, रा. करंजी. ता. मालेगाव, जि. वाशिम व सचिन प्रल्हाद कांबळे, वय ३४ वर्ष, रा. पंचशिल नगर, वाशिम यांना दि. १९/०२/२०२२ रोजी वाशिम येथूनच अटक करण्यात आली असून अटक आरोपींकडून डेल कंपनीचे ०२ लॅपटॉप किं रू.७९,०००/- व रोख रक्कम रू. ८,०००/- असा एकूण ८७,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी नामे संदीप दत्ता लहाने याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो व त्याच्या वर नमूद साथीदारांनी दि. १७/०१/२०२२ रोजी ०२:३० ते ०४:०० वाजताच्या दरम्यान पुणे सोलापूर हायवेवर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे ए.टी.एम.सेंटर फोडून त्यातून काही रक्कम चोरली होती. सदरप्रकरणी यवत पोलीस स्टेशन अप.क.५९/२०२२, कलम ३८०,४२७,३४ भा.दं.वि. अन्वये दाखल असून सदर चोरलेली रोख रक्कम ३,००,०००/- रू. (तीन लाख रू.) सोनखास शिवारातील एका विहीरीच्या कपारीमध्ये लपवून ठेवली होती. सदरची रोख रक्कम त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली असून गुन्हयाचा तपास चालू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो., अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे साो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. रफीक शेख यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे, पो.ह.क. ३४७/लालमणी श्रीवास्तव, पो.ना.क. ८५६/रामकृष्ण नागरे, पो.ना.क. २१०/मात्रे, पो.शि.क. २४३ / विठ्ठल महाले व पो.शि.क. ३०३/संदीप वाकुडकर यांनी पार पाडली आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206