Home > Crime news > पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई ;गॅस कटरने घरफोडी करणा-या आरोपीस अटक

पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई ;गॅस कटरने घरफोडी करणा-या आरोपीस अटक

Po. City Washim City Action: Accused arrested for burglary with gas cutter

पो. स्टे.वाशिम शहरची कारवाई ;गॅस कटरने घरफोडी करणा-या आरोपीस अटक
X

वाशिम:-फिर्यादी नामे डॉ. सचिन दशरथ कड, वय ४२ वर्ष, धंदा-डॉक्टर (वैद्यकिय व्यवसाय), रा. माउली हॉस्पीटल च्या वर, अकोला नाका, वाशिम यांनी दि. २७/१२/२०२१ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली की, दि. २०/१२/२०२१ रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास ते व त्यांची पत्नी व मुले घरातील दरवाज्याला कुलूप लाउन काश्मिर येथे फिरावयास गेले होते. दि. २७/१२/२०२१ रोजी सकाळी ०४:१५ वाजताच्या सुमारास फिर्यादी काश्मिर हून त्यांच्या घरी वाशिम येथे परत आले व त्यांनी घरात जाउन पाहिले असता घरातील त्यांनी सि.सि.सी.टि.व्ही. कॅमे-यांवर स्प्रे मारून घराचा दरवाजा गॅस कटरने कापलेला दिसला व त्या पलीकडे जाउन पाहिले असता लोखंडी जाळी व टिन देखील कापलेले दिसले व घरातील सोन्याचांदीच्या वस्तू, रोख रक्कम व ०२ लॅपटॉप अशी एकूण १,८४,०००/- रू. ची मालमत्ता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर फिर्यादी हे पो.स्टे. ला आले असता त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पो.स्टे. वाशिम शहर अप.क. १४४१ /२०२१, कलम ४५४,४५७,३८० भा.दं.वि. अन्वये नोंद करण्यात आला.

मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो. यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रफीक शेख यांनी सदर गुन्हयाच्या तपासाबाबत डि.बी. पथकास आदेश देउन रवाना केले असता डि.बी. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे देवानंद वसूदेव डाखोरे, वय २५ वर्ष, धंदा-शेती, रा. नारायण शिंदे यांच्या घराच्या शेजारी, भिलदूर्ग, ता. मालेगाव, जि. वाशिम यास त्याच्या राहते घरून ताब्यात घेउन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देउन त्याने सदरचा गुन्हा त्याच्या ईतर ०६ साथीदारांसमवेत केला असल्याचे सांगितले. नमूद आरोपीस अटक करून रिमांडकामी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून त्याच्याकडे चौकशी करून गुन्हयातील चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करीत आहोत. तसेच डि.बी. पथक ईतर आरोपींचा शोध घेत आहे. नमूद आरोपीचे इतर साथीदार नामे १) अजय रमेश शेंडे, रा. सहजपुर, ता. हवेली, जि. पुणे २) ऋषिकेश काकासाहेब किर्ते, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद व ३) शिवाजी उत्तम गरड, रा. करंजी, ता. रिसोड, जि. वाशिम यांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने यवत पो.स्टे. अप.क. ५९/२०२२, कलम ३८०,४२७,३४ भा.दं.वि. या गुन्हयात अटक केली असून त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी वाशिम येथे फिर्यादी श्री. सविन दशरथ कड यांच्या घरी गॅस कटरने चोरी केल्याचे सांगितले आहे. तसेच पुणे पोलीसांनी नमूद आरोपींनी वाशिम येथून चोरी केलेला एक लॅपटॉप, किंमत रू. ४४,०००/- व गॅस कटर जप्त केले आहे. नमूद आरोपींना प्रोडयुस वॉरंटद्वारे ताब्यात घेउन पुढील कारवाई करीत आहोत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो., अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. रफीक शेख यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे, पो.ह.क. ३४७/लालमणी श्रीवास्तव, पो.ना.क. ८५६/रामकृष्ण नागरे, पो.शि.क. २१०/मात्रे, पो.शि.क. २४३/विठ्ठल महाले व पो.शि.क. ३०३/संदीप वाकुडकर यांनी पार पाडली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 24 Jan 2022 8:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top