Home > Crime news > वि.न्यायालयापुढे 'त्या' आत्मसमर्पन केलेल्यापैकी ०६ आरोपी पोलीस रिमांडमध्ये;पोलिस तपास सुरु

वि.न्यायालयापुढे 'त्या' आत्मसमर्पन केलेल्यापैकी ०६ आरोपी पोलीस रिमांडमध्ये;पोलिस तपास सुरु

Out of those who surrendered before the court, 06 accused in police remand; police investigation started

वि.न्यायालयापुढे त्या आत्मसमर्पन केलेल्यापैकी ०६ आरोपी पोलीस रिमांडमध्ये;पोलिस तपास सुरु
X

(फुलचंद भगत)

वाशिम:-पोलीस ठाणे रिसोड जि. वाशिम येथे दि. १२/०५/२०२० रोजी फिर्यादी भावनाताई पुंडलिकराव गवळी,रा. रिसोड, अध्यक्षा महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण रिसोड व जनशिक्षण संस्था वाशिम यांनी आरोपी संस्थेचे सचिव अशोक नारायणराव गांडोळे, उपाध्यक्ष सौ. वर्षाताई अशोकराव हेलसकर व संस्थेचे ईतर संचालक, कर्मचारी सदस्य गणेश बालाजी ढोले, सौ. अरुणा संजय हलगे, शकुंतला बालाजी कासार, महेश उर्फ विवेक ज्ञानदेव देवगिरे, हरिभाउ ज्ञानेदेव देवगीरे, मधूकर नारायण हेलसकर, उध्दव नारायण गांडोळे, समाधान उर्फ दुर्गाप्रसाद मधूकर हेलसकर, सि. ए. उपेंद्र गुणवंतराव मुळे, भागवत छगन पेंदे, दिशेन दशरथ दोरशेटवार, विनोद साहेबराव पाढरे, भार ज्ञानदेव देवगिरे, संतोष बद्रीप्रसाद सोमाणी, युवराज लिंबाजी पांढरे, व धनंजय मनोहर हलगे या १९ आरोपी विरुद्ध महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण रिसोड व जनशिक्षण संस्था वाशिम यांच्या मार्फतीने चालविले जाणारे देगांव येथील आयुर्वेदिक बी. ए. एम. एस. महाविद्यालय, बी. फार्म, डी. फार्म व भावना पब्लीक स्कुल मध्ये नमुद आरोपी हे सचिव, संचालक, कर्मचारी, सदस्य पदावर असताना सन २००८ ते जुन २०१९ पर्यंत विदयार्थ्यांचे शैक्षणीक फी ची व्हाउचरव्दारे १९,८५,४२,७५६ /- रुपयाचे अपहार केल्याचे तक्रारीवरून अप. न. ३८९ / २०२० कलम ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. कलम १३ (१) (अ), (ब), १३ (२) भ्रष्ट्राचार प्रतिबंधक (सुधारणा) अधिनियम २०१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपीतांनी शासकीय अनुदानाचे अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.नमुद गुन्हयातील १० आरोपी आपली अटक टाळण्याकरीता फरार राहल्याने त्यांचे वि. जिल्हा न्यायाधिश - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाशिम यांचेकडून पकड वारंट घेण्यात आले होते. आरोपी हे आपली अटक टाळण्याकरीता फरार राहल्याने पकड वारंटची बजावणी होवू शकली नव्हती. आरोपी हे गुन्हयात फरार झाल्याने व वारंटची जबावणी चुकविण्यासाठी गुप्तपणे वावरत असल्याने वि. जिल्हा न्यायाधिश - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाशिम यांनी दिनांक १०/०६/२०२२ रोजीचे आदेशान्वये नमुद १० आरोपींना कलम ८२ Crpc अन्वये व्यक्तीश: वि. न्यायालया राहण्याबाबत फर्मविले होते.सदर गुन्हयातील आरोपी नामे १. अशोक नारायण गांडोळे संस्था सचिव रा.जे.डी.सी. प्लॅटीनम टॉवर,महर्षी नगर, स्वारगेट पुणे २. सौ. वर्षाताई अशोकराव हेलसकर संस्था उपाध्यक्ष रा.जे.डी.सी. प्लॅटीनम टॉवर,महर्षी नगर, स्वारगेट पुणे ३. गणेश बालाजी ढोले रा.जे.डी.सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर, स्वारगेट पुणे ४.शकुंतला बालाजी ले / कासार रा.जे. डी. सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर, स्वारगेट पुणे ५. हरिभाउ नामदेव देवगिरे रा.जे.डी.सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर, स्वारगेट पुणे ६. भारत ज्ञानदेव देवगिरे रा. जे. डी. सी. प्लॅटीनम टॉवर, महर्षी नगर, खारगेट पुणे ७. दिनेश दशरथ दोरशेटवार रा. साई महक अपार्टमेंन्ट, मोहन नगर नागपूर हे दिनांक ०१/१०/२०२२ रोजी वि. वि. जिल्हा न्यायाधिश - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाशिम यांचे न्यायालया समोर आत्मसमर्पण केले असून मा. न्यायालयाने त्यांना तपास अधिकारी यशवंत केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी मंरुळपीर यांचे ताब्यात दिले असून ०६ आरोपी तपासकामी दिनांक १२/१०/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत.सदर गुन्हयाचा तपास मा. बच्चनसिंह पोलीस अधीक्षक वाशीम यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत केडगे,ऊपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर हे करीत असून शासनाचे वतीने वि. सत्र न्यायालयात श्री. अभिजीत व्यवहारे, सरकारी वकील हे काम पहात आहेत.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 8 Oct 2022 1:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top