Home > Crime news > हिंगणघाट तालुक्यात अंमली पदार्थासह खुलेआम दारूविक्री.

हिंगणघाट तालुक्यात अंमली पदार्थासह खुलेआम दारूविक्री.

Open sale of liquor with drugs in Hinganghat taluka.

हिंगणघाट तालुक्यात अंमली पदार्थासह खुलेआम दारूविक्री.
X
हिंगणघाट प्रतिनिधी:

गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी पोलिसांच्या आशीर्वादाने जागोजागी शहरात अवैध दारूविक्री खुलेआम सुरु आहे.या अवैध दारूविक्रीसह शहरात मटका तसेच अंमली पदार्थाची मोठी रेलचेल आहे.

शहरात

आठवडीबाजार,रेल्वेस्टेशन, जुना कॉटन मार्केट,कारंजा चौक परिसराजवळ मंदीराच्या मागेच खुलेआम दारु विक्री सुरू आहे, जेव्हा दर्शनार्थी या मंदीरामध्ये दर्शनसाठी जातात तेव्हा त्याचा सामना दारूविक्रेत्यासह तळीरामांसोबतही होतो.

शहरात दारुची गटारगंगा उघडपणे वाहात असून अनेक मोकयाच्या ठिकाणी खुलेआम बार चालविले जात आहे,याला पोलिसांची नुसतीच मूकसंमतीच नाही तर पूर्णतः संरक्षण सुद्धा असल्याचे बोलले जात आहे.

शहरातच नव्हे तर तालुक्यात दिवसाढवळ्या मोठ्या कंटेनरने दारूपुरवठा होत असून पोलिस संरक्षणातच मालवाहकद्वारे या अवैध दारुचे वितरण केले जाते.

ज्या जिल्ह्यात दारु खुली त्या जिल्ह्यात तरी प्रार्थनास्थळ किंवा शाळेच्या १०० मीटरचे परिघात दारू विकण्याची परवानगी नाही.

परंतु हिंगणघाट शहरात मंदिरमस्ज़िदीजवळ, रेल्वे स्टेशन,बसस्टैण्ड अशाठिकाणी देशीविदेशी कोणतीही दारू सहज उपलब्ध होते.भ्रमणध्वनीवरुनही ऑनलाइन दारू कुठेही उपलब्ध होते.

पब्लिक प्लेसवरती येथे खुलेआम दारू विकण्याची परवानगी कोणी दिली यांना कोणी दिली असा प्रश्न आता आम जनता करू लागली आहे. तालुक्यातील वर्धा रस्त्यावर तसेच वडनेर येथे अनेक दारू पुरविल्या जात आहे,शहरात खटखटरूपाने अवैध सट्टा खुलेआम सुरु आहे,या सर्व अवैध धंदयास पोलिसांचा आर्शिवाद असून हा सगळा व्यवसाय बिनबोभाट चालतो .

*खुलेआम दारु विक्री करा आणि आम्हाला हप्ता द्या!*

दारुवाल्यांनी पोलिसांना हप्ता दिला नाही तर पोलिस त्या ठिकाणी धाड टाकून कारवाई करतात.आणि भाबड्या जनतेला पोलिसांनी अवैध दारू बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केल्याचा गैरसमज होतो.

परंतु चिरिमिरी मिळताच पुन्हा दारूविक्री जोमात सुरु होते.

जनतेने कितीही तक्रारी केल्या तरीही काही फरक पडत नाही. गेल्या काही दिवसांत कारंजा चौक पासुन रेल्वेस्टेशन पर्यंत मोठी भाईगिरी वाढली आहे. परतु पोलिस कानाडोळा करीत असली आहे.

शहरातील काजी वार्ड,फुले वार्ड,टाका ग्राउंड येथेसुद्धा मोठ्याप्रमाणात अवैध दारूविक्री होत आहे,फुले वार्ड येथून दारू येणारे श्रमिक,हमाल एवढेच नव्हे तर नोकरीपेशातील अनेक तळीराम लक्ष्मी टॉकीज परिसरात दारू पिऊन लोळल्याचे दिसुन येतात.या परिसरात एक अल्पवयीन बालकसुद्धा या दारुच्या आहारी गेल्याने दारूसाठी आटापीटा करतांना नेहमी आढळून येतो.

पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या या अवैध धंदयामुळे शहर व परिसरात गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसुन येत असून वाढत्या गुन्हेगारीचे मुळ यातच आहे.

Updated : 30 May 2022 12:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top