Home > Crime news > दोन समुदायात तुफान हाणामारी एक गंभीर जखमी तर १२ व्यक्तींना जबर मार

दोन समुदायात तुफान हाणामारी एक गंभीर जखमी तर १२ व्यक्तींना जबर मार

One person was seriously injured and 12 people were severely injured in the stormसमुद्रपूर : -तालुक्यातील नारायणपूर ( कोळसे ) गावात आपसी वादातून दोन समुदायात झालेल्या हाणामारीत एक गंभीर जखमी झाले तर १२ व्यक्तींना जबर दुखापत झाली आहे . तर २० ते २५ लोकांना किरकोळ मार बसला.

घटनेत आंनद दौलतराव सडमाके ( वय -६० ) हे गंभीर जखमी असून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.माणिक पुंडलीक सडमाके ( वय -३८ ), गजानन आंनद सडमाके ( वय -३५ ), मनोहर महादेव मसराम( वय -३८ ), प्रमोद महादेव कोराम ( वय -३५ ), मंगेश महादेव मसराम ( वय -३४ ), शत्रुघन कवडू सडमाके ( वय -४५ ), प्रशांत आंनद सडमाके ( वय -२७ ),राजु किसना बारई ( वय -५१ ), रमेश बारई( वय -२७ ) , दादा श्रीराम बारई ( वय -६५ ),रघुनाथ श्यामराव बारई ( वय -५९ )हे गंभीर जखमी असून त्यांना सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले तर इतर जखमींना ग्रामिण रूग्णालयात प्रथमोपचार देण्यात आले. शुक्रवारी ( ता.२३ ) सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान सडमाके व बारई कुटूंबियांमध्ये जुन्या वादातून वाद झाला व दोन्ही कुटुंबियातील सदस्य व व इतर आपसात भिडले व लाठ्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ला केला. अर्धा तास हल्ला प्रतिहल्ला सुरू होता. समुद्रपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावात तणावाचे वातावरण असून गावात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन समुदायात नेमका कोणता वाद आहे ह्याची चौकशी होणे गरजेचे आहे. पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलिस करित आहे.

प्रतिनिधी अतुल गुजरकर

समुद्रपूर वर्धा

Updated : 2021-07-25T10:02:02+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top