Home > Crime news > सोनोरी फाट्याजवळ विचित्र अपघातामध्ये एक ठार तर दोन गंभीर

सोनोरी फाट्याजवळ विचित्र अपघातामध्ये एक ठार तर दोन गंभीर

One killed, two seriously injured in bizarre accident near Sonori Fateh

सोनोरी फाट्याजवळ विचित्र अपघातामध्ये एक ठार तर दोन गंभीर
X

मो रिजवान सिद्दिकी


मूर्तिजापूर तालुका विशेष प्रतिनिधी

सोनाली फाट्याजवळ विश्राम दातामध्ये एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 जून रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नसून पुन्हा एक विचित्र अपघात सोनोरी जवळील घडला असून यात शेख इम्रान शेख रहेमान वय 32 रा काटेपुर्णा यांचा जागीच मृत्यू झाला


मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या सोनोरी गावाजवळील अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना अकोला कडे जाणारे दोन ट्रकच्या मध्ये दबून दुचाकीस्वार शेख इमरान जागीच ठार झाले हा युवक बडनेरा येथे सी एन डब्ल्यू विभाग मध्ये फिटर म्हणून काम करत होता दररोज प्रमाणे काटेपूर्णा वरून बडनेरा येथे आपल्या ड्युटी वर जात असताना हा अपघात घडला . यात न्‍द्रपाल गोकुलकोरी वय 28 रा मध्य प्रदेश प्रमोद राज कुमार गोस्वामी वन 30 उल्हासनगर कल्याण मुंबई हे दोन्ही गंभीर जखमी झाले त्यांचा उपचार लक्ष्मीबाई देशमुख जिल्हा रुग्णालय येथे करण्यात येत आहे अपघात घडल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सर्व वाहतूक ठप्प झाली होती वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशन पीएसआय वानखडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळली दोन्हीकडील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली

Updated : 28 Jun 2021 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top