Home > Crime news > गोधणी मध्ये कुख्यात गुंड सुभाष अंजीकरची दगडाने ठेचून हत्या

गोधणी मध्ये कुख्यात गुंड सुभाष अंजीकरची दगडाने ठेचून हत्या

Notorious goon Subhash Anjikar was stoned to death in Godhani

गोधणी मध्ये कुख्यात गुंड सुभाष अंजीकरची दगडाने ठेचून हत्या
X

यवतमाळ दि.१ जुन -:शहरापासुन पाच किमी अंतरावर असलेल्या गोधणी या गावात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुभाष अंजीकर या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली.ही थरारक घटना आज दि.१ जुन रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास गोधणी येथील चिंचेच्या झाडाखाली घडली.त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.गोधणी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच माधुरी अंजीकर यांचा तो मोठा मुलगा आहे.यापुर्वी त्यावर विनयभंग,मारहाण तसेच पोक्सो अंतर्गत त्याच्या शिरावर गुन्ह्यांची नोंद आहे.घटना स्थळाची उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी पाहणी करुन पुढील तपास अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस करित आहे.

Updated : 1 Jun 2021 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top