Home > Crime news > भोसा परिसरात जुगारावरील कारवाई 1 लाखात रफादफा?

भोसा परिसरात जुगारावरील कारवाई 1 लाखात रफादफा?

भोसा परिसरात जुगारावरील कारवाई 1 लाखात रफादफा?
X

भोसा परिसरात जुगारावरील कारवाई 1 लाखात रफादफा?

यवतमाळ- जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. घटनास्थळावर जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून जुगारातील पैसेसुद्धा जप्त केले. मात्र, एक लाख रूपये घेऊन जुगार प्रकरण रफादफा करण्याचा प्रताप त्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे शनिवारी १२ डिसेंबर रोजी दिवसभर पोलिस वर्तुळात त्या रफादफा झालेल्या जुगाराची चर्चा सुरु होती. हा प्रकार शुक्रवारी११ डिसेंबर रोजी भोसा परिसरात घडला. एकही अवैध धंदा शहरातच नव्हे, तर जिल्ह्यात चालू देणार नाही, असा इशारा एक ना अनेक वेळा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दिला आहे. सुरूवातीला काही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने अवैध धंद्यावर कारवायासुद्धा केल्या. मध्यंतरी अवैध धंदे किंवा धंदेवाल्यांकडून पोलिस कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याची माहिती मिळताच जवळपास सात पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील केली होती. शेवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी बंद करणे सुरू केले होते. अशात शुक्रवारी शहरातील भोसा परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली होती. अवधुतवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह एलसीबीतील एका कर्मचाऱ्याने भोसा परिसरातील एका फॅक्टरीजवळ सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. कारवाई न करण्याकरता जुगाऱ्यांनी एक लाखाची ऑफर दिली होती. ही ऑफर स्वीकारुन कारवाई न करता प्रकरण रफादफा केले.

Updated : 2020-12-13T11:55:06+05:30
Next Story
Share it
Top