Home > Crime news > नायगाव येथील मेडिकलचे दुकान फोडणाऱ्या चार चोरट्यांपैकी एकाला नायगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

नायगाव येथील मेडिकलचे दुकान फोडणाऱ्या चार चोरट्यांपैकी एकाला नायगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

Naigaon Medical's shop caught four thieves by sending them to the village hall.

नायगाव येथील मेडिकलचे दुकान फोडणाऱ्या चार चोरट्यांपैकी एकाला नायगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
X

नायगाव ता प्रतिनिधी

सय्यद अजिम नरसीकर


नायगावच्या बाजार पेठेत मेडिकल फोडून रोख रक्कम व घड्याळ चोरून नेणाऱ्या एका चोरट्यास गस्तीवर असलेल्या नायगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केलयाची घटना ५ मे च्या पहाटे घडली असून इतर तीन चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत फरार झाले,चोरीच्या प्रकरणात वापरलेल्या दोन मोटार सायकली व एक आरोपी यास नायगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीस ५ मे रोजी नायगाव येथील दिवाणी न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबद अधिक वृत्त असे की दररोजच्या प्रमाणे नायगाव पोलीस गाडी पेट्रोलिंग वर होती. त्यातील पोलीस उप निरीक्षक बाचावार यांना जनता हायस्कुल समोर चार व्यक्ती संश्यास्पद रित्या फिरत असल्याचे भ्रमणध्वनिवरून कळाले तेंव्हा पोलीस गाडी जुन्या नायगाव शहरात गस्तीवर होती. सदर गाडीचा मोर्चा जनता हायस्कुल कडे वळवण्यात आला पोलीस गाडी येताच चोरट्याने दोन मोटारसायकली जाग्यावर सोडून पोबारा केला.बाचावार यांनी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना संपर्क साधून सापळा रचला.चोरट्यास संशय न येऊ देता गाडी पलीकडे घेऊन जाऊन दुसऱ्या रस्त्याने गस्तीवरील पोलीस कर्मचार्यांच्या आंगावरचे शर्ट काढून ठेऊन दबा धरून गाडी दिसेल असं पोलिसांना लपवले.

त्या ठिकाणी गाडी तशीच पाहून पीएसआय बाचावार व चालक विलास भोळे यांनी गाडी बाजूला लावून दबा धरून बसले सदर घटना 5 मे गुरुवारच्या रात्री पहाटे 2.50 वा घडली चोरटे व पोलीस यांच्या लपा छपीचा खेळ दीड तास चालला.या नंतर चोरटे गाडी नेण्या साठी आल्या नंतर पोलीस गाडी आल्याचे पाहून चोरट्याने पळ काढला यात वयस्कर असलेला चोर तारासिह पुजारासिंह टाक वय 60 वर्ष रा देगलूर यास पाठलाग करून बाचावार आणि त्यांच्या सहकारी पोलीस बांधवानी पकडले तर बाकीचे वयाने कमी असलेले तीन चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

जनता हायस्कुल मधील योगेश सूर्यकांत पवळे यांच्या शिवनेरी मेडिकलचे शटर फोडून आठ हजार रु रोख व एक तीन हजार रु.ची घड्याळ चोरट्याने चोरली असलयाची फिर्याद योगेश पवळे यांनी दिली असून त्याच्या समोरील डि बी पाटील होटाळकर यांच्या कॉपलेक्स मधील डाँ झुंजारे यांचे शटर फोडण्याचा प्रयत्न पोलीस गाडी आली असल्याने फसला असल्याचे कळते.

अटक केलेल्या आरोपीने सोबतच्या तीन आरोपीचे नावे सांगितले असून पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार साईनाथ एन.सांगवीकर हे पुढील तपास करीत आहेत.

*चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल चोरीचीच*

चोरीच्या प्रकरणात वापरलेली मोटार सायकल चोरीचीच असून त्याच रात्री कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळगाव छत्री येथून ही मोटार सायकल चोरली आहे.या संबधी कुंटुर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.शिवाय नायगाव शहरात याच रात्री माधव धडेकर पत्रकार यांच्या बंधूंची मोटार सायकल विठलं नगर नायगाव येथून रात्री चोरीस गेल्याने या चोरट्याने रात्री पळून जाण्यासाठी ही मोटार सायकल चोरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Updated : 6 May 2022 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top