प्रेम प्रकरणात लैंगिक शोषण करून प्रियेसीचा खून
Murder of a sweetheart by sexual abuse in a love affair
X
चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील घटना
मृत्यूक दीक्षा बांबोळे हिने लिहिला आहे सुसाईड नोट मध्ये संपूर्ण कहाणी
करण आर.कोलगुरी
चंद्रपुर जिला संपादक
तेलंगाना राज्य प्रतिनिधि
मो.9373441679.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील दीक्षा बांबोळे वय वर्ष 21 या तरुणीचा दिनांक 21 जुलै रोजी तिच्या राहत्या घरीच तिचा गळा दाबून खून करण्यात आला . मृतक दीक्षा बांबोळे ही विनोद जक्कुलवार या मारेकरी तरुणाकडे त्याच्या फोटो स्टुडीओत व सेतू केंद्रात नेहमीच जात असल्याने लग्नाचे आमिश दाखवले.
त्यामुळे या दोघांचे हळूहळू प्रेमसंबंध जुळून आले या प्रेम संबंधातूनच तिला गर्भधारणा सुद्धा झाली मृतक दीक्षा बांबोळे या तरुणींने गर्भधारणा झाल्याचे वारंवार सांगून सुद्धा मारेकरी विनोद जक्कुलवार यांनी लग्नास नकार दिला व तिच्या सोबत लग्न न करता तिचा गर्भपात सुद्धा केला. दिनांक 21 जुलै रोजी दीक्षा ही एकटीच घरी असल्याचा फायदा घेऊन मारेकरी विनोद जक्कुलवार यांनी तिच्या घरी जाऊन तिला मारहाण सुद्धा केली नंतर तिचा गडा दाबून तिचा खून सुद्धा केला सदर खून हा जातीय तिरस्कारातून व सतत लैंगिक शोषणातूनच झाला. .
मारेकरी विनोद जक्कुलवार या तरुणास पोलिसांनी तात्पुरती अटक करून त्याला सोडून दिले अश्या निर्दयी गुन्हेगारास ताबडतोब अटक करून त्याच्यावर गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी मृतक दीक्षा बांबोळे ची आई किरण अविनाश बाम्बोडे यांनी केली आहे . तशी आष्टी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार सुद्धा दिलेली आहे .
मुलीला न्याय मिळवुन देण्यासाठी भिम आर्मी चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष. जितेंद्र डोहने तसेच शेडुलकास्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बाम्बोडे जिल्हा अध्यक्ष मेश्राम पोलीस पाटील मारकबोडी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम, रामटेके सर येणापूर यांनी मृतक मुलीच्या घरी जाऊन भेट देऊन सदर प्रकरणाला वाचा फोडली. गुन्हेगारास अटक न केल्यास आंदोलन करण्याचा संकल्प सेडुलकास्ट फेड्रेसशनने सुद्धा केला .सदर प्रकरणात पोलीस काय कारवाही करतात?? या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. इतकेच नव्हे तर आरोपींना मोकळे सोडण्यासाठी पोलीसांनी आपले खिसे गरम केले असल्याचे चर्चिले जात आहे..