Home > Crime news > मोटरसायकलची डीवायडर ला धडक लागून मोटरसायकल स्वार जखमी,झुल्लर रोडवरील घटना

मोटरसायकलची डीवायडर ला धडक लागून मोटरसायकल स्वार जखमी,झुल्लर रोडवरील घटना

Motorcycle rider injured after hitting motorcycle divider, incident on Zullar Road

मोटरसायकलची डीवायडर ला धडक लागून मोटरसायकल स्वार जखमी,झुल्लर रोडवरील घटना
X

अमोल सांगानी

राळेगाव यवतमाळ

9860276226

वडकी येथे झुल्लर रोडवरलगत असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 7 वर मोटरसायकल स्वाराने डीवायडर ला जबर धडक दिल्याने यात मोटरसायकल स्वार हा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज दि 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली,

मोटरसायकल एम एच 34 डब्ल्यू 3576 या क्रमांकाची असून सदर मोटरसायकल स्वार हा मद्यधुंद अवस्थेत हिंगणघाट दिशेने वडकी येथे येत असल्याने वडकी नजीक असलेल्या झुल्लर पॉईंट वर मोटरसायकल स्वाराने रोडच्या डीवायडरला जबर धडक दिली यात मोटरसायकल स्वार यांचे डोक्याला,कानाला व हातापायाला जबर मारून लागून गंभीररीत्या जखमी झाला,अपघातात जखमी झालेल्या इसमाची सध्या तरी ओळख पटली नसून अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तात्काळ वडकी बिटचे पोलीस कर्मचारी किरण दासरवार,asi अशोक भेंडाळे,ट्राफिक पोलीस जमादार इकबाल शेख,ट्राफिक पोलीस अशोक जाधव हे दाखल झाले त्यांनी जखमींला पुढील उपचारासाठी वडणेर रुग्णालय येथे दाखल केले,या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे,

Updated : 9 Sep 2021 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top