Home > Crime news > जबरीने पैसे हिसकावले,दोघांना अटक,मंगरुळपीर येथील घटना

जबरीने पैसे हिसकावले,दोघांना अटक,मंगरुळपीर येथील घटना

Money snatched, two arrested, incident at Mangrulpeer

जबरीने पैसे हिसकावले,दोघांना अटक,मंगरुळपीर येथील घटना
X

जबरीने पैसे हिसकावले,दोघांना अटक,मंगरुळपीर येथील घटना

मंगरुळपीर ता २२/ दुचाकीने घरी जाणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीस अडवून तसेच डोळ्यात चटणी टाकून १३,४०० रुपये जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना ता २१ चे रात्री उशिरा अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत सदाशिव झंझाड वय ४५,रा हुडको कॉलनी मंगरुळपीर यांनी तक्रार दिली की,ता ११ चे रात्री नऊ वाजता फिर्यादी हे त्यांचे दुकान बंद करून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे मागून पत्रकार कॉलनी रस्त्याने घरी जात असतांना मागून दुचाकीने चार जण आले.त्यातील एकाने फिर्यादीच्या डोळ्यात चटणी टाकून जमिनीवर पाडले तर दुसऱ्याने खिशातील १३,४०० रुपये जबरीने काढून घेतले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक १३५९/२०२० कलम ३९५ भादवी नुसार गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणाचा तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी हाती घेतला.तपासात पो हे कॉ ज्ञानेश्वर राठोड, डि बी पथकाचे पोलीस कर्मचारी अमोल मुंदे, मोहम्मद परसुवाले,सचिन शिंदे,रवी वानखडे तसेच सुनील गंडाईत,मिलिंद भगत यांनी ता २१ चे रात्री या प्रकरणातील आरोपी सतिष कैलास प्रधान वय २२,रा मोहगव्हान ता मंगरुळपीर व आकाश किसन मोरे वय २७,रा शहापूर,मंगरुळपीर यांना अटक केली.तसेच ता २२ पोलिसांनी आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Updated : 22 Dec 2020 1:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top