Home > Crime news > यतवमाळ जिल्हयात गुन्हेगारी करुन दहशत पसरविणाऱ्या कुख्यात सचिन येडा सह चार गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कारवाई.

यतवमाळ जिल्हयात गुन्हेगारी करुन दहशत पसरविणाऱ्या कुख्यात सचिन येडा सह चार गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कारवाई.

Mocca action against four criminals, including Sachin Yeda, notorious for spreading terror by committing crimes in Yatavmal district.

संपादक, जाकीर हुसेन - 9421302699


महाराष्ट्र पोलीस

विशेष पोलीस वार्तापत्र पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ.

दिनांक :- २८/०५/२०२२

यतवमाळ जिल्हयातील वेगवेगळ्या शहरात संघटीतपणे गुन्हेगारी करुन दहशत पसरविणाऱ्या कुख्यात सचिन येडा सह चार गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कारवाई.

•संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा कायद्याच्या धर्तीवर १९९९ साली महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोक्का कायदा तयार करण्यात आला. मोक्का कारवाई ही विशेष कोर्टात चालविली जाणारी कारवाई असुन गुन्हेगारी पार्श्वभूमी व सराईत गुन्हेगारांवर अंकुश लावण्याकरीता मोक्का हे प्रभावी हत्यार पोलीसांकडे आहे. याचाच उपयोग करीत पोलीस अधिक्षक, यवतमाळ डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी सर्व पोलीस स्टेशन व उप विभागिय पोलीस अधिकारी यांना त्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना वठणीवर आणण्या करीता MPDA, तडीपारी व मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दरम्यान दिनांक ०१ डिसेंबर २०२१ रोजी पोलीस स्टेशन आर्णी येथे एका बोलेरो पिकअप च्या चालकास नागपुर-तुळजापुर हायवेवर काही अज्ञात इसमांनी अडवुन जबर मारहाण करीत त्याच्याजवळील रोख २५,००० रुपये हिसकावून नेल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस स्टेशन आर्णी येथे अप.क्रं. ९५०/२१ कलम ३९४, ३४९, ३६७, ३२४, ५०६ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करून ठाणेदार आणी पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात तपास सपोनी नागेश जायले यांच्या कडे सपुर्द करण्यात आला. तपासादरम्यान तपासी अधिकारी यांनी वाटमारीच्या या गुन्ह्यांना आळा बसावा या उद्देशाने सदर गुन्हयाचा बारकाईने तपास करीत आरोपी १) सचिन ऊर्फ येडा छगन राठोड, २) शुभम सुभाष जोगदंड ३) यश साहेबराव राऊत ४) रोहन गणेश इंगळे ५) करण प्रेमदास पवार यांना सदर गुन्हयात आरोपी निष्पन्न करीत अटक केली व त्यांच्याविरुध्द ३९५ भा.द.वि. व सह कलम ४/२५ भारतीय हत्यार कायद्याची कलम वाढ केली. आरोपीतांची सखोल चौकशी व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पडताळली असता सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. वर नमुद ५ ही गुन्हेगारांवर यापुर्वी खंडणी, दरोडा, चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराच्या सहायाने गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव तयार करुन दंगा इत्यादी सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याचे उघड झाल.

या गुन्हेगाराचा अभिलेख तपासला असता पोलीस स्टेशन अवधुतवाडी, यवतमाळ शहर, यवतमाळ ग्रामीण, तसेच पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे ३९५, ३८५, ३०७, ३६७, ३५३, ३२४, १२०(ब), १४३, १४७, १४८,१४९, भा.द.वि. तसेच ४/२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे नोंद असल्याने पोलीस उपमहानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती याच्या मान्यतेने MCOCA अंतर्गत कलम वाढ करुन उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा तथा सहा. पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सदरच्या पाचही आरोपींविरुध्द सखोल तपास केला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का कायद्यान्वये सखोल, सविस्तर व गुन्हात्मक तपास करण्यात आला.

पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी पाचही आरोपीविरुध्द मोक्का अंतर्गत दोषारोप पत्र पाठविण्याची मंजुर मिळण्यासाठी मा. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. दिनांक २६/०५/२०२२ रोजी १) सचिन ऊर्फ येडा छगन राठोड, वय २५ वर्ष, रा, जामनकर नगर, यवतमाळ २) शुभम सुभाष जोगदंड वय २२ वर्ष, रा. पांढरी, ता. जि. यवतमाळ ३) यश साहेबराव राऊत वय २० वर्ष, रा. अप्सरा टॉकीजच्या मागे, यवतमाळ ४) रोहन गणेश इंगळे वय १९ वर्ष, रा. जवळा, ता. आर्णी जि. यवतमाळ ५) करण प्रेमदास पवार वय २३ वर्ष, रा. जामनकर नगर, यवतमाळ या पाचही आरोपीतांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये दोषारोप पत्र पाठविण्याची मंजुरी मिळाली असुन दि. २७/०५/२०२२ रोजी दोषरोप पत्र मा. विशेष न्यायाधिक्ष MCOCA यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले.

सदरची कार्यवाही ही डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक, यवतमाळ व अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. खंडेराव धरने यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा तथा सहा. पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वात पोनि पितांबर जाधव ठाणेदार आर्णी, प्रदिप परदेशी, पोनि स्थागुशा, सपोनी नागेश जायले, सपोनी विवेक देशमुख, पोउपनि भगवान पायगन, पोहवा गजानन डोंगरे, नापोकॉ विनोद राठोड, नापोका दिनेश जाधव, नापोकों कविश पाळेकर नापोका पुरुषोत्तम जाधव पोकों मोहम्मद भगतवाले यांनी पुर्णत्वास नेली.

आजपावेतो पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या खंबीर नेतृत्वात यवतमाळ पोलीस जिल्हा दलाकडुन मागील वर्षभन्यात मोक्का कायद्यान्वये एकुण ३ गुन्हेगारी टोळयांवर कारवाई करुन दोषारोपपत्र पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये एकूण २४ सराईत गुन्हेगाराविरुध्द मोक्का कायद्यान्वये प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हयातील आत पर्यंत एकुण १८ सराईत गुन्हेगारांविरुध्द एमपीडीए कायदयाअंतर्गत प्रभावी कारवाई करुन गुन्हेगारी टोळयांवर परिनामकारक नियंत्रण मिळवुन यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने यशस्वी कामगिरी केली आहे. अधीक्षक कार्यालय

(डॉ. दिलीप पाटील- भुजवळ) पोलीस अधीक्षक, यवतमाळ.

Updated : 28 May 2022 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top