Home > Crime news > मुलीची चिता जळत असतांना वडीलानि विष घेतल्याचा निरोप

मुलीची चिता जळत असतांना वडीलानि विष घेतल्याचा निरोप

Message of father taking poison while his daughter's cheetah was burning

मुलीची चिता जळत असतांना वडीलानि विष घेतल्याचा निरोप
X

मुलीची चिता जळत असतांना वडीलानि विष घेतल्याचा निरोप

मारेगाव : प्रतिनिधी

एकुलत्या एका मुलीने गळफास घेतल्याचे कळताच वडीलाच्या वेदना असह्य झाल्या.दुर्देवी घटनेचा क्षण पाहून मन सुन्न झालेल्या वडीलाचा विरह असह्य झाल्याने वडीलाने विष घेत जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.आत्महत्या केलेल्या मुलीची चिता जळत असतांना वडीलाच्या विष घेतल्याचा निरोप धडकताच उपस्थित शोकाकूलात वेदनेची भर पडल्याने मार्डी शोकमग्न झाला आहे.

अवघ्या दोन महिन्यापूर्वी पतीच्या मृत्यू नंतर आज मंगळवारला सकाळी सात वाजताच्या सुमारास रोशनी आशिष झाडे हिने आपल्या नऊ महिन्याच्या चिमुकलीसह मार्डी येथील वडिलांचे घरी गळफास घेतला यात दुर्दैवाने रोशनी चा मृत्यू झाला तर चिमुकलीचे प्राण वाचले. पण मुलीने आत्महत्या केली याचे दुःख असह्य झाल्याने सकाळपासून बेपत्ता असलेले मुलीचे वडील जीवन वैद्य यांनी सिंधी गावा जवळ असलेल्या कुंभा रस्त्यावरील मंदिरासमोर विष प्राशन केले तब्येत अत्यवस्थ झाल्याने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मार्डी येथील वेदनादायी घटनेत नातीचा प्राण वाचला. मात्र एकुलत्या एका मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.अखेरचा निरोप देत रोशनीची चिता जळत असतांना वडीलाने विष घेतले.धक्क्यावर धक्के बसत असलेल्या वैद्य कुटूंब व मार्डीकरांसाठी आजचा दिवस काळा ठरला.

Updated : 9 Jun 2022 8:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top