Home > Crime news > युट्यूब विडिओ ची कमाल....घरातच नोट छापणारी बँक

युट्यूब विडिओ ची कमाल....घरातच नोट छापणारी बँक

Maximum of YouTube videos .... bank printing notes at home

युट्यूब विडिओ ची कमाल....घरातच नोट छापणारी बँक
X

"नागपूरच्या दोन तरुणांना अटक"केतकी विशाल पांडे विशेष प्रतिनिधी म-मराठी न्यूज नेटवर्क

नागपूर/महाराष्ट्र

नागपूर येथे धाड टाकून पोलिसांनी नकली नोटा छापणाऱ्या दोन तरुणांना अटक केले आहे.

दोघे तरुण युट्युब वर व्हिडीओ पाहून घरातच 100 रुपयांच्या नोटा छापायचे आणि लोकांमध्ये विविध कामांसाठी वितरित करायचे.

आता पर्यंत दोन लाखाहून अधिक नोटा ह्या ठगांनी छापल्या आहे.ह्या दोन्ही ठगांना आज 31 मे रोजी पोलिसांनी जेरबंद केले.


how to print currency notes अशा प्रकारचे सर्च दिलेत तर अनेक video दिसतील. असल्याच काही यूट्यूब व्हिडीओंच्या आधारे नागपुरातल्या एका टोळक्याने खोट्या नोटा छापायचा उद्योग सुरू केला. पोलिसांनी धाड मारून त्यांचा अवैध उद्योग बंद केला आहे. नागपूर पोलिसांनी नकली नोटा छापण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोघांपैकी एक इसम 24 वर्षीय निलेश कदबे वर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा 24 वर्षीय मारूफ खान उर्फ रफीक खान आहे.

या दोघांनी आतापर्यंत दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार

हे दोघे यूट्यूबवरून नकली नोटा बनवण्यास शिकले.

या दोघांकडून नकली नोटा छापल्या जात असल्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी एकता नगरातील निलेश कदबे याच्या घरी धाड टाकली.

येथून पोलिसांनी एक कॉम्प्युटर दोन प्रिंटर आणि शंभर रुपयांच्या नकली नोटा हस्तगत केल्या आहेत.

निलेश या नकली नोटांचा वापर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी करत असे. त्याने दारू, जेवण आणि इलेक्ट्रॉनिक सामानाची खरेदी केली होती. जास्त किमतीच्या नोटा छापण्यामध्ये धोका अधिक असल्यानं या दोघांनी शंभर-शंभर रुपयांच्या आणि पन्नास रुपयांच्या नकली नोटा छापल्या होत्या. नागपूर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आजकाल तंत्राज्ञान वाढले असून इंटरनेट स्मार्टफोनचा उपयोग तरुण काही गैरकामांसाठीही करताना दिसून येत आहेत. युट्युबच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टींची माहिती घेता येते तशीच अशाप्रकारे गैरकामे कशी करावीत, याचीही माहिती मिळते. अलिकडे झटपट पैसा मिळवण्याच्या नादात ही तरुणाई अशा गैरमार्गाने पैसा मिळवतात. मात्र, त्याचा कधी ना कधी भांडाफोड होतो आणि उरलेले आयुष्य मग तुरुंगात काढायची वेळ येते. त्यामुळे तरुणांनी इंटरनेट आणि युट्युबचा चांगल्या कामासाठी वापर करावा, असे आवाहन करण्यात येत असते.

Updated : 2021-05-31T21:48:10+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top