Home > Crime news > पोलिसांवर गोळीबार प्रकरणी मास्टरमाइंड आशिष राऊत यास अटक..

पोलिसांवर गोळीबार प्रकरणी मास्टरमाइंड आशिष राऊत यास अटक..

हिंगणघाट दि.१८ ऑगस्ट

हिंगणघाट पोलिसांवर नुकत्याच दोन युवकांनी गोळीबार केल्या प्रकरणी अनैतिक संबंधाची पार्श्वभूमि असल्याची माहिती पोलिस चौकशी दरम्यान पुढे आली आहे.

हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दित हिंगणघाट शहरात तसेच नजीकच्या येनोरा येथे सतत दोन दिवस पोलिसांवर गोळीबार केल्या प्रकरणी

पोलिस स्टेशन हिंगणघाट अपराध क्र ७०७/२१ कलम

३०७, ३५३, ३४ भादंवी सह कलम ३, २५, २७ भारतीय

हत्यार कायदयाअंतर्गत गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती

आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आशिष

भोलानाथ राऊत(२८) मु. येनोरा ( हिंगणघाट)याचे त्याच गावातील एका इसमाचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सदर इसम मागील

जानेवारी महिन्यात त्याच्यामागे कु-हाड घेऊन धावला

होता. गावात पुन्हा आढळून आल्यास जीवे मारण्याची धमकी

दिली होती. त्याचे भीतीने आशिष राऊत हा गाव

सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे राहयला गेला होता.

त्याने मुळ बिहार राज्यातील आरोपी जिशान शेख उर्फ जितेंद्र गुप्ता रा.अहेरी जि.गडचिरोली याचेशी संपर्क साधून अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या पतिला जिवानिशी ठार मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती.

महिलेच्या पतिचा काटा काढण्यासाठी आरोपी एका अल्पवयीन आरोपीसह हिंगणघाट येथे आला होता, त्यानुसार दि.११ ऑगस्ट रोजी रेकी करुन हे दोन्ही आरोपी देशी कट्टयाने दुसऱ्या दिवशी दि.१२ रोजी काम फत्ते करणार होते.

परंतु हिंगणघाट येथे पोलिस जमादार धोटे यांचेवर बंदूक ताणल्याने हिंगणघाट पोलिस त्यांचे मागे लागली,दूसरे दिवशी त्यांचा मागोवा घेतांना दोघेही येनोरा शिवारात असल्याची डिपी पथक चे शेखर डोंगरे यांना माहिती मिळाली,रात्रभर त्यांचा पोलिस पथकाने शोध घेतला असता पहाटे एक आरोपी येनोरा शिवारातच पकडला गेला तर दुसऱ्या आरोपीला हिंगणघाट रेल्वे लाइन परिसरात सकाळी पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.या आरोपींना पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसुन चौकशी केली असता सदर

गुन्ह्यातील सुपारी देणारा मास्टरमाइंड आरोपी आशिष भोलानाथ राऊत यास अटक करण्यात आली. हिंगणघाट पोलिस उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण उपनिरीक्षक अमोल लगड,सादीक शेख , शेखर डोंगरे , विवेक बनसोड, प्रशांत भाईमारे रवि वानखेडे , सचिन घेवनदें , सचिन भालशंकर, निलेश तेलराधे, विशालबगांले, यांचे मार्गदर्शनाखाली कैलास दाते,

पुढील तपास करत आहेत.

Updated : 2021-08-18T20:11:10+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top