Home > Crime news > मालेगाव येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी अटक

मालेगाव येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी अटक

Malegaon Urdu school principal arrested in bribery case

मालेगाव येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी अटक
X

मालेगाव येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी अटक

फुलचंद भगत

वाशिम - मालेगाव येथील वीर हुतात्मा वासुदेव बळवंत फडके उर्दू हायस्कुल चे मुख्याध्यापक मोहम्मद तनवीर अब्दुल हारून पठाण ह्यांना शाळेतील शिक्षकाचे वैद्यकीय बिल पुढे पाठविण्या साठी 2500 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.


या बाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी दि.08/06/2022 रोजी रिपोर्ट दिला की, विर हुतात्मा वासुदेव बलवंत फडके ऊर्दु हायस्कुल मालेगाव, जि.वाशिम येथील मुख्याध्यापक मोहम्मद तन्वीर अब्दुल हारुन पठान यांनी तक्रारदाराच्या वडीलांचे मेडीकल बिलावर सही करण्याकरीता 7000 रु. लाचेची मागणी करित असल्याबाबत तक्रार दिली.सदर तक्रारीची दि.21/06/2022 रोजी शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान विर हुतात्मा वासुदेव बलवंत फडके ऊर्दू हायस्कूल मालेगाव, जि.वाशिम येथे तक्रारदार यांना त्यांच्या वडीलांचे मेडीकल बिलावर सही करण्याकरीता 2500 रु . लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्विकारण्याची संमती दर्शवली.

दि.22/06/2022 रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे मोहम्मद तन्वीर अब्दुल हारुन पठान यांनी लाच रक्कम स्विकारली नाही.त्यामुळे आज दि.24/06/2022 रोजी आलोसे मोहम्मद तन्वीर अब्दुल हारुण पठाण यांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपिविरूद्ध पोस्टे मालेगाव जि. वाशिम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सापळा व तपास अधिकारी श्री. सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. वाशिम .या कारवाई पथकामध्ये श्री. सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक, पोहेकॉ. नितीन टवलारकर, पोहेकॉ. राहूल व्यवहारे, योगेश खोटे मपोहेकॉ. योगीता गायकवाड, चापोना. मिलिंद चन्नकेसला ला. प्र. वि. वाशिम यांचा समावेश होता.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 24 Jun 2022 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top