Home > Crime news > मंगरुळपीर शहरात पोलीस अधीक्षक पथकाची वरली मटका अड्डावर मोठी कारवाई; ५७ लोकांवर गुन्हे दाखल

मंगरुळपीर शहरात पोलीस अधीक्षक पथकाची वरली मटका अड्डावर मोठी कारवाई; ५७ लोकांवर गुन्हे दाखल

Major action taken by Superintendent of Police at Worli Matka base in Mangrulpeer city; Crimes filed against 57 people

मंगरुळपीर शहरात पोलीस अधीक्षक पथकाची वरली मटका अड्डावर मोठी कारवाई; ५७ लोकांवर गुन्हे दाखल
X

मंगरुळपीर शहरात पोलीस अधीक्षक पथकाची वरली मटका अड्डावर मोठी कारवाई; ५७ लोकांवर गुन्हे दाखल

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-मा.पोलीस अधिक्षक वाशिम यांनी जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्याचा चंग बांधल्यानंतर वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर रोजच एका पाठोपाठ एक कारवाया सुरु आहेत. त्या अनुषंगाने मा.अपर पोलीस अधीक्षक वाशिम त्यांचे अधिपत्याखालील कर्मचारी यांचे पथक तयार करुन मंगरुळपीर येथे मिळालेल्या माहिती प्रमाणे कारवाई करण्यात आली.

दिनांक १२/०४/२२ रोजी मा. पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे राजधानी लॉज व विठठल मंदीर मंगरुळपीर येथे टिनपत्राचे शेड मध्ये सार्वजनिक ठिकाणी काही इसम वरली मटका, ऑनलाईन चक्रीचा जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी पथकाने रेड केली असता सदर कारवाईत आरोपीत नामे १) विशाल डिगांबर चौधरी वय ३७ वर्ष रा.अशोकनगर मंगरुळपीर, २) बंडु उत्तम हिसेकर वय ४५, ३) बालाप्रसाद शंकरलाल शर्मा वय ७३ वर्षे रा जनता बँक मंगरुळपीर, ४) रमजान अन्नु परशुवाले वय ३५ वर्षे रा मंगरुळपीर, ५) संतोष लक्ष्मण डांगे वय ५२ वर्षे रा. चांदई ता.मंगरुळपीर, ६) शंकर चंद्रभान राउत वय ६० वर्षे रा लावणा ता.मंगरुळपीर, पळून इसम व जागेचे मालक यांचे ताब्यातुन १,०८,९७० /- रोख रक्कम व वरली मटका साहित्य, ऑनलाईन चक्रीचे साहित्य हस्तगत करून पोलीस हवालदार राजेश निर्बाण नेमणुक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम यांचे फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमचे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात, अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे, पो.ह/९६८ राजेश निर्बाण, पोना/९८७ गणेश बाजड, पोना/३६१ कैलास नागरे, पोकॉ/१२६६ राजकुमार यादव, पोकॉ/४४२ अमोल कापडी यांनी सहभाग नोंदविला.मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री बच्चन सिंह यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक म्हणुन, अशा प्रकारची काही तक्रार असल्यास मा. पोलीस अधिक श्री. बच्चन सिंह यांचेशी सपर्क साधावा. माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 13 April 2022 5:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top