लाखाळा वाशिम येथील कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
Local Crime Branch raids Kuntankhana in Lakala Washim
X
वाशिम:-दि. १८/०८/२०२२ रोजी मा. पोलीस अधीक्षक साहेब यांना पिटा अंतर्गत कारवाई करणे बाबत माहिती मिळाल्याने पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना माहिती देउन त्यांचे अधिपत्या खाली अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन कारवाई करणे बाबत आदेशीत केले.
दिनांक १८/०८/२२ रोजी गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, वाशिम ते झाकलवाडी`रोडवरील एका उच्चभ्रु वस्ती असुन त्या वस्तीमध्ये रिकु उर्फ छाया नामदेव उबाळे वय ४३वर्षे रा. झाकलवाडी रोड तीचे मालकीचे पक्कयाघरामध्ये वेश्या व्यवसायकरीता काही महिलांना आणुन त्यांच्याकडुन अनैतिक व्यापार (वेश्याव्यवसाय) काम करुन घेते असल्याबाबत माहिती मिळाली. त्या माहितीवरुन स्त्रिायांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियक १९५६ अन्वये कायदेशीर करवाई करणे कामी बनावट ग्राहक यांना बोलावुन त्यांना मिळालेल्या माहीती बाबत सविस्तर माहीती देवुन रेड केली असता तेथे महिलांचे अनैतिक व्यापार (वेश्या व्यवसाय ) चालविणारी एक महीला व महिलांचे अनैतिक व्यापार (वेश्या व्यवसाय करणा - या ०५ महिलांना व ०२ पुरुष ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे कडुन नगदी २,५९,५००रु व ०३ मोबाईल किंमत अंदाजे ३०,०००रु व इतर साहित्य असा एकुण २,९१,५५०रु चा माल जप्त करुन ताब्यात घेतले. यातील छाया नामदेव उबाळे रा. झाकलवाडी रोड लाखाळा वाशीम ही तिचे राहते घरामध्ये वैश्याव्यवसायाकरीता महिलांना बोलावुन त्यांचेकडुन वैश्याव्यवसाय करुन त्यातुन मिळणा-या पैशांवर त्यांचे घराची उपजिवीका चालवुन कुंटणखाणे चालविणे अशा कृत्यामुळे यातील कुंटणखाना चालविणारी रिकु उर्फ छाया उबाळे व दोन ग्राहकांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करणे करीता पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांनी तक्रार देवुन गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदशनात पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव, सपोनि प्रमोद इंगळे, पोउपनि शब्बीर पठाण, स्वाती इथापे, पोहवा किशोर चिंचोळकर, सुनिल पवार, दिपक सोनवणे, पोना राजेश राठोड, अमोल इंगोले, प्रविण राउत, गजानन गोटे, पोका संतोष शेनकुडे, अविनाश वाढे,डिंगाबर मोरे, व मपोहेका सुषमा तोडकर, रेश्मा ठाकरे व अंगुलीमुद्रा तंज्ञ रोहीनी रिंडे, महेश आखरे, अविनाश इंगोले, संदिप सरोदे यांनी सहभाग नोंदविला.मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री बच्चन सिंह यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक म्हणुन, अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती दयावी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन केले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206