Home > Crime news > अवैध धंदया विरोधी मोहिमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखे कडुन वाशिम जिल्हयात पाच ठिकाणी जुगार धंदयावर छापा

अवैध धंदया विरोधी मोहिमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखे कडुन वाशिम जिल्हयात पाच ठिकाणी जुगार धंदयावर छापा

३४ इसमांवर कारवाई करुन एकुण ५५,६७० / - रु चा मुददेमाल जप्त

अवैध धंदया विरोधी मोहिमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखे कडुन वाशिम जिल्हयात पाच ठिकाणी जुगार धंदयावर छापा
X

अवैध धंदया विरोधी मोहिमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखे कडुन वाशिम जिल्हयात पाच ठिकाणी जुगार धंदयावर छापा

३४ इसमांवर कारवाई करुन एकुण ५५,६७० / - रु चा मुददेमाल जप्त

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांनी जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्याचा चंग बांधल्या नंतर वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर रोजच एका पाठोपाठ एक कारवाया सुरु आहेत. त्याअनुषंगाने पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्यांचे अधिपत्याखालील कर्मचारी यांची पथके तयार करुन वाशिम जिल्हयात गस्ती करीता रवाना करण्यात येतात.
दिनांक २१/०५/२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे नंदी मंदीरा जवळ पाटणी चौक मध्ये सार्वजनिक ठिकाणी काही इसम ५२ ताश पत्त्याचा जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी जुगार रेड केली. सदर कारवाईत आरोपी नामे १) जॉय आनंता अल्हाडा व इतर १४ सर्व रा. अल्हाडा प्लॉट वाशिम यांचे ताब्यातुन २०,८५०/- रोख रक्कम व जुगार साहित्य हस्तगत करण्यात आले तसेच श्रध्दा वाईन बारचे मागे पुसद नाका वाशिम या ठिकाणी संतोष मारोती घुगरे व इतर ७ सर्व रा. शेलुरोड ता. जि. वाशिम यांचे कडुन ५२ तास पत्ते व नगदी रुपये १२,५६०/- मुददेमाल हस्तगत करण्यात आला. पोस्टे वाशिम ग्रामीण हददीत ग्राम सुराळा येथे जुगार छापा टाकला असता एक महिला व दोन पुरुष यांना वरली मटक्याचे आकडयावर जुगार खेळताना पकडुन त्यांचेकडुन १०८५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. पोस्टे मानोरा हददीत ग्राम भोईनी येथे जुगार छापा टाकला असता एकुण ५ आरोपी अटक करून कारवाई करण्यात आली त्यांचेकडुन ६७९० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोस्टे धनज हददीत कामरगाव हददीत वरली मटका जुगार खेळणाऱ्या ०२ आरोपीना अटक करुन ४६२०/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असा एकुण ५५६७० / - रु मुददेमाल जप्त करुन एकुण ३४,इसमांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमचे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे,पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पो.ह सुनिल पवार, पोना प्रशांत राजगुरु, राजेश राठोड, राजेश गिरी, राम नागुलकर, पोकॉ निलेश इंगळे, संतोष शेणकुडे, डिगु मोरे, किशोर खंडारे, शुभम चौधरी यांनी सहभाग नोंदविला.मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री बच्चन सिंह यांनी सर्वजनतेस सुजाण नागरिक म्हणुन, अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती दयावी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 21 May 2022 8:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top