स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही; राजगाव शिवारातील पैनगंगा नदीवरील बॅरेजचे तांबे चोरनारे ०४ चोरटयांना अवघ्या १२ तासात गजाआड
Local crime branch proceedings; Four thieves who stole copper from the barrage on Panganga river in Rajgaon Shivara were nabbed in just 12 hours.
X
वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक वसंत परदेशी सो यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्या पासुन अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्रे,मालमत्तेचे उघड न झालेले गुन्हे उघड करण्यासाठी वेळोवेळी विशेष पथक नेमुन बरेच गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वाशिम जिल्हयातील पोस्टे वाशिम ग्रामीण हददीत राजगाव शेतशिवारात पैनगंगा नदीवर असलेल्या बॅरेजवर लावलेल्या तांब्याच्या पटटया वजन ५० किलो किंमत ७५०००/-रु.चे चोरी गेल्याबाबत पोस्टे वाशिम ग्रामीण येथे फिर्यादी अभियंता भुसारी जिवन प्राधीकरण विभाग वाशीम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अप. नं. २८६/२१ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हयातील चोरी गेलेला माल व आरोपीचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, काही इसम एका अॅटोमध्ये तांब्याच्या पटटया विकी करीता वाशिम शहरात घेवुन आले आहेत. अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मा. वरिष्ठांना माहिती देवुन सापळा रचुन चार आरोपी नामे १) अर्जुन नादेव खंडारे वय २७ वर्ष रा. पाण्याचे टाकी जवळ वाशिम, २)निखील दौलत कांबळे वय १९वर्ष रा.रा.वाझोळा ता.जि. हिंगोली ह.मु नालंदा नगर वाशिम, ३)सौदागर भगवान कांबळे वय ३०वर्ष रा.वाझोळा ता.जि. हिंगोली, व ४)प्रशांत नामदेव भगत वय २० वर्ष रा.वाझोळा ता.जि. हिंगोली यांना तांब्याच्या पटटया वजन ५० किलो किंमत ७५०००/-रु. व एक ॲटो की ३०,००० रु असा एकुण १०५०००रु चा माल ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. वाशिम ग्रामीण यांचे ताब्यात दिले.
सदर कार्यवाहीमध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री.वसंत परदेशी,मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.विजयकुमार चव्हाण याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकातील सपोनि अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, सफौउपनिरीक्षक नारायण जाधव,पोना किशोर चिंचोळकर,पोना अमोल इंगोले,पोशि अश्विन जाधव,निलेश इंगळे,संतोष शेणकुडे,प्रविण राउत,किशोर खंडारे यांनी सहभाग नोंदविला.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206