4 दुचाकी चोरटयांना एलसीबी ने केली अटक, 8 दुचाकी जप्त
LCB arrested 4 two-wheeler thieves, seized 8 two-wheelers
X
यवतमाळ- दुचाकी लंपास करणाऱ्या चार सराईत चोरट्यांना पकडण्यात एलसीबी पथकाला यश आले असून त्या चौघांकडून आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई २४ जुलै सकाळी पार पाडण्यात आली असून जितेंद्र जाधव रा. तिवसा, नागसेन उर्फ बालू मनवर रा. कामठवाडा, संदिप उर्फ मोघन कांबळे रा. यवतमाळ आणि आकाश कुमरे रा. जांब, यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहे.चोरट्यांनी जिल्ह्यातील रूग्णालये, बसस्थानक, खाजगी रुग्णालय आणि बँकांना टार्गेट केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहे. या वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घसेता एलसीबी पथकाने दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू केला होता. अशातच यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात रेकॉर्डवरील सराईत चोरटा आकाश कुमरे हा संशयीतरित्या आढळून आला. त्याला एलसीबीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्याने एका पाठोपाठ आठ दुचाकी यवतमाळ, नेर आणि दारव्हा तालुक्यातील रूग्णालय, बँक आणि बसस्थानक परिसरातून लंपास केल्याची कबूली दिली. तसेच त्या दुचाकी साथीदार जितेंद्र जाधव, नागसेन मनवर आणि संदिप कांबळे याच्या मदतीने विक्री केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्याच्याकडून आठ दुचाकी किंमत सव्वा लाख रूपयाच्या जप्त केल्या.