प्रतिबंधीत गुटखा साठवणुक व विक्री करना-यावर कारंजा शहर पोलीसांची धाड 1,60,350/- रु चा मुद्देमाल जप्त
Karanja City Police seizes Rs 1,60,350 / - for storing and selling banned gutka
X
प्रतिबंधीत गुटखा साठवणुक व विक्री करना-यावर कारंजा शहर पोलीसांची धाड 1,60,350/- रु चा मुद्देमाल जप्त
वाशिम:-गुटखा तंबाखु पान मसाला चे सेवन हे माणवी आरोग्यास अंत्यत धोकादायक असुन सेवनाने विवीध जिवघेणे आजार जडतात म्हणुन महाराष्ट्र शासनाने गुटखा तंबाखु पान मसाला विक्री करणारे कींवा साठवणुक करण्यावर प्रतिबंध घातला आहे. असे असले तरी काही जन चोरुण लपुन गुटखा तंबाखु पान मसाला नामक विषाची विक्री करत असतात. त्यांच्यावर पोलीस अधिक्षक साहेब वाशिम श्री बंच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखालीव नैतृत्वाखाली कायद्याच बडगा उगारत कार्यवाहीचा सपाटा सुरु केला आहे.
पोस्टे कारंजा शहर हद्दीतील काझीपुरा येथे मोठ्या प्रमाणात गुटखा साठवणुक व विक्री होत असल्याची गुप्त माहीती वरुण कारंजा पोलीसांनी सदर ठीकाणी धाड टाकली काझीपुरा येथील रहीवाशी असलेला जिकरान खान कलीम खान वय 32 वर्ष रा. उस्मानीया मजिद जवळ काझीपुरा कारंजा हा गुटखा अवैध्य पणे त्यांचे राहते घरी शासनाने प्रतिबंधीत केलेला येथे साठवणुक व विक्री करत असल्याचे दिसुण आले.सदर घराची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचे राहते घरात 1,60,350/- रु चा प्रतिबंधित माल पंचासमक्ष जप्त केला वरुण सदर आरोपीस ताब्यात घेवुण अटक करण्यात आली.सदर आरोपी विरुध्द पोस्टे कारंजा शहर येथे / 2022 कलम 328 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुण पुढील तपास सुरु आहे.
सदर कार्यवाही ही पोलीस अधिक्षक साहेब वाशिम श्री बंच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री जगदिश पांडे, ठाणेदार श्री आधारसिंग सोनोने यांचे नेतृत्त्वाखाली सपोनि प्रशांत जाधव, पोहेका चरन चव्हाण ब.नं. 04, नापोका अनिल राठोड ब.नं.182,पोका फिरोज खान ब.नं. 1345, रोहण तायडे ब.नं. 906 यांनी सदरची कामगीरी पार पाडली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206