Home > Crime news > जे.सि. बि. चोरणा-या चोरट्यास अल्लीपुर पोलीसांनी केली जे.सि.बि. सह अटक

जे.सि. बि. चोरणा-या चोरट्यास अल्लीपुर पोलीसांनी केली जे.सि.बि. सह अटक

J.C. B. Allipur police arrested the thief JCB. Arrested with

जे.सि. बि. चोरणा-या चोरट्यास अल्लीपुर पोलीसांनी केली जे.सि.बि. सह अटक
X
अल्लीपुर येथे दि. 21/04/2022 रोजी 21/00 वा. चे सुमारास फिर्यादी नाम अशोक पांडुरंग ढंगे, वय 60 वर्ष, रा. भवानी वार्ड, अल्लीपुर यांचे मुलाचे लग्न असल्याने ते लग्नाचे कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांचेकडे जे.सि.बि. चालविण्याचे काम मागण्यास आलेल्या एका अनोळखी इसमाने फिर्यादीचा मुलगा अतुल पांडुरंग ढगे याचे मालकीचा रुपये 18,00,000/ किंमतीचा जे.सि.बि. क्र. MH-32-AH-1923 हा चोरुन नेला अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन दि. 22/04/22 रोजी पोस्टे. अल्लीपुर येथे अप क्र. 236/22 कलम 379 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन अनोळखी आरोपीचा शोध घेण्यासाठी अल्लीपुर पोलीस पथकाला सुचना देण्यात आल्या. पोलीस पथकाने आपली तपासाची चक्रे फिरवुन सदर आरोपी बाबत बोरखेडी नागपुर येथील टोलनाक्यांवरुन अनोळखी आरोपी बाबत माहीती गोळा केली. सदर माहीती वरुन पोलीस पथकाने प्रथम नागपुर त्यानंतर भंडारा गाठले तेथे मिळालेल्या गुप्त माहीती वरुन अखेर पोलीस पथकाला आरोपी नामे संतलाल देवचरन टंडन वय 36 वर्ष रा. रामपुरा तह. साजा जि. बेमेतरा राज्य छत्तीसगड यास भंडारा ते राजनांदगाव रोडवर चीचोली, छत्तीसगड जवळुन चोरलेल्या जे. सी. बी. सह ताब्यात घेण्यात आले..

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्री. आबुराव सोनवने व श्री. गोकुलसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनिल गाडे यांचे निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक स्वप्रील भोजगुडे, पो. हवा. अजय रिठे ब.नं. 513, चा. पो.हवा. शंकर पोहाणे ब.नं. 1175, पोहवा. विनोद बुरीले ब.नं. 746, ना.पो. शी. संदीप झिले ब.नं. 711. ना. पो. शी. अभय वानखेडे ब.नं. 1269, ना.पो. शी. धर्मेन्द्र उमक व.नं. 966 यांनी केली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. श्री. सुनिल गाडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. स्वप्रील भोजगुडे हे करीत आहे.


Updated : 25 April 2022 4:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top