Home > Crime news > जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकले; सिंदखेराजा तालुक्यातील घटना

जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकले; सिंदखेराजा तालुक्यातील घटना

Javaya stabs father-in-law; incident in Sindkheraja taluka

जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकले; सिंदखेराजा तालुक्यातील घटना
X

बुलढाणा प्रतिनिधी अजिमखान 99701 08888

ही घटना १ जुलै वर्दडा ( ता. सिंदखडराजा) येथे घडली

कारण असे की *दारू पिऊन माझ्या मुलीला का करतोस असे म्हणणाऱ्या सासऱ्याला जावयाने चाकूने भोसाकले

सासरा गंभीर जखमी असल्या मुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार चालू आहे. २ जुलैला त्यांना अटक करण्यात आली आज त्यांना न्यायालयात हजर केले. ५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.अजय विजय पवार(२४) विजय रामसिंग पवार (४५) अशी आरोपींची नावे आहे.

वर्दडा येथील गणेश सुभाष भोसले यांची मुलगी कोमलचा विवाह गावातील अजय विजय पवार सोबत झाला आहे. अजय ने १ जुलै रोजी दुपारी कोमलला मारहाण केली. त्यामुळे कोमल चे वडील गणेश भोसले जावई अजय च्या घरी गेले व कोमल ला मारहाण करू नका असं सांगितले.

त्यानंतर सासरा जावयात बाचाबाची झाली. अजय ने त्याचे सासरे यांच्यावर चाकूने वार केले. त्यात गणेश भोसले यांच्या पोटात व मानेवर गंभीर दुखापत झाली.यात अजय चे वडील विजय पवार यांनीसुद्धा अजयला मदत केली.गंभीर जखमी अवस्थेत गणेश भोसले यांना साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी गणेश भोसले यांची बहीण गीता सुभाष पवार (३६) त्यांचा तक्रारी वरून पोलिसांनी दोन्ही बापलेकान विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

*झेड. ए. खान*

Updated : 2021-07-03T20:45:10+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top