Home > Crime news > शुल्लक कारणावरून जावयाने केला सासर्याचा खून

शुल्लक कारणावरून जावयाने केला सासर्याचा खून

Javaya killed his father-in-law for a fee

शुल्लक कारणावरून जावयाने केला सासर्याचा खून
X

शुल्लक कारणावरून जावयाने केला सासर्याचा खून

घाटंजी शहरातील पांढूर्णा रोड वरील असलेल्या उपलेंचवार सर यांच्या शेतातील कोठ्यात शेतगडी म्हणून एक महिन्यापूर्वीच राहायला आलेले रविंद्र रामदास आडे पत्नी अनिता रामदास आडे त्यांची दोन लहान मुले आणी अनिता चे वडील दत्ता बापुराव मरापे हे कुटूंब राहत होते दी. 28 /6 ला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अनिता व वडील दत्ता मरापे हे शेतीच्या विषयावर बोलत बसले होते तेव्हाच रविंद्र आडे दारू पिवून तिथे रागाच्या भरात आला आणी म्हणाला की तुम्ही दोघे माझ्याच चुगल्या करीत आहात या शुल्लक कारणावरून हातात लाकडी काठी घेऊन सासर्यास मारहाण सुरू केली ते सोडविण्यास अनिता गेली असता अनिता च्या पाठीवर काठीने मारून परत सासर्यास काठीने मारहाण केली सासरा रक्तबंबाळ झाल्याने खाली पडला . आता प्रकरण अंगलट येते हे समजताच पत्निला धमकी देत म्हणाला या गोष्टीची कुठे वाच्यता जर केली तर तुला ऊभी फाडून टाकीन असे म्हणून तो निघून गेला तो जाताच अनिता ने चिखलवर्धा येथे फोन करुन भावाला घटनेची माहिती दिली असता भावाने घाटंजी गाठून वडीलांना सांंकाळी सात च्या दरम्यान घाटंजी येथिल शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले पण प्रक्रूति गंभीर असल्याने डाॅक्टरांनि वडिलांना यवतमाळ येथे ऊपचारासाठी नेण्याचे सांगितले पण रुपयाची व्यवस्था नसल्याने वडिलास परत शेतातील गोठ्यात नेले .रात्री एक वाजता वडिलांची प्राण ज्योत मावळली त्यामुळे अनिता आणी तिच्या भावांनी घाटंजी पोलीस स्टेशन ला दुपारी दोन ला रितसर तक्रार दाखल करून आरोपीवर गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार मणीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पि एस आय विलास सिडाम करीत आहेत.

संजय ढवळे घाटंजी

Updated : 29 Jun 2022 7:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top