Home > Crime news > IPL क्रिकेट सट्टा, मंगरुळपीर येथे रेड, ३० आरोपी विरुध्द कारवाई

IPL क्रिकेट सट्टा, मंगरुळपीर येथे रेड, ३० आरोपी विरुध्द कारवाई

IPL cricket betting, raid at Mangrulpeer, action against 30 accused

IPL क्रिकेट सट्टा, मंगरुळपीर येथे रेड, ३० आरोपी विरुध्द कारवाई
X

IPL क्रिकेट सट्टा, मंगरुळपीर येथे रेड, ३० आरोपी विरुध्द कारवाई

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-मा. पोलीस अधिक्षक वाशीम श्री बच्चनसिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्या पासुन वाशीम जिल्यातील गुंडा विरुध्द तसेच अवैध्य धंदयाविरुध्द धडक मोहीम हाती घेवुन वाशीम जिल्हयातील गुंड प्रवृतीचे लोकांवर व अवैध्य व्यवसायीकांवर -धकड कार्यवाही करुन त्यांचा मुचक्या आवळल्या व वाशीम जिल्यातील वातावरण भयमुक्त करण्यावर प्राधान्याने भर दिला आहे.

मा.पोलीस अधिक्षक वाशीम श्री बच्चनसिंह यांनी जिल्यातील अवैध्य धंदे करण्यारे व अवैध्यरित्या किकेट सट्टा चालविणाऱ्या इसमांविरुध्द विशेष मोहीम सुरु केली. त्या मोहीमे अंतर्गत दिनांक १२.०४.२०२२ रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती मिळाली की,मंगरुळपीर शहरात आय पी एल २०२२ मधील क्रिकेट सटयावर आज दिनांक १२.०४.२०२२ रोजी मंगरुळपीर ते कवठळ रोड वरील एका शेतात दोन इसम मोबाईल फोनच्या सहयाने CSK विरुध्द RCB या सामन्यावर लोकांकडुन मोबाईल द्वारे किकेट मॅच वरील प्रत्येक रन,बॉलींग,बॅटींग यावर पैसे लावुन घेवुन हारजीत करीत आहेत.अशा माहीती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले असता नमुद पथकाने दोन पंचाना बोलावून त्यांना मिळालेली माहीती देवुन मंगरुळपीर ते कवठळ जाणान्या रोडवरील विशाल घडीनकर याचे शेतात जमीनीवर मोटार सायकलचे लाईटचे उजेडात बसुन दोन इसम मोबाईल फोनच्या सहयाने CSK विरुध्द RCB या सामन्यावर लोकांकडुन मोबाईल द्वारे क्रिकेट मॅच वरील प्रत्येक रन,बॉलींग,बॅटींग यावर पैसे लावुन घेवुन हारजीत चा जुगार खेळ खेळत असताना आरोपी नामे १) राहुल बालचरण सांळुखे, २) जय दयालगिर गिरी दोन्ही रा.मंगरुळपीर मिळुन आले. त्यांचे कडुन आय पी एल किकेट सटया करीता वापरण्यात आलेले ०६ मोबाईल व एक स्कुटी,तसेच नगदी ३६३०रु असा एकुण ९९,३६०२ चा माल मिळुन आला त्यांचेसोबत सटटा लावण्यात सामिल असलेले एकुण २५ ते ३० फरार आरोपी नामे संतोष,लखन,देवा,चेतन, पाटील,मोहसीन, गोलु, तायडे, सर्वा, पियुश, सुजित, आकाश,सोनु, निलेश, स्वप्नील, जय, टोपण नाव एनटी,जीएम,एसपी,एमआर,एआर,एफ,केबी,एसके,बीटी,भाऊ,पीबी,टायगर ,त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमचे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार असलेल्या आरोपीवर त्यांचा शोध घेऊन अटक करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पोहेका किशोर चिंचोळकर, दिपक सोनवणे पोना अमोल इंगोले, प्रविण राउत, अश्विन जाधव यांनी सहभाग नोंदविला आहे.

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 13 April 2022 5:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top