Home > Crime news > घारफळ शिवारातील घटना पतीने पत्नीचा केला खूण

घारफळ शिवारातील घटना पतीने पत्नीचा केला खूण

Incident in Gharphal Shivara Husband marks wife

घारफळ शिवारातील घटना पतीने पत्नीचा केला खूणबाभूळगाव ता प्र शहजाद शेख जी यवतमाल :- पतीने पत्नीच्या डोक्यावर काठीने मारहाण करून खूण केल्याची घटना 4 जुलैइ रोजी रात्री 1.30 वाजता दरम्यान संजय राठी यांच्या घारफळ शिवारातील शेतातील बंड्यावर घडली.

पत्नी मृतक शांती सुरेश पाटणकर 40 वर्षे रा.जुतपानी ता धारणी असे मृतक महिलेचे नाव आहे.

सारफळी ते घारफळ रोडवर संजय राठी यांचा बंडा आहे .धारणी येथील सुरेश सोनू पाट णकर 45 , मृतक शांती सुरेश पाटणकर हे दोघेही पती पत्नी गेल्या दोन वर्षा पासुन संजय राठी यांच्या कामाला असून या बंड्यात राहत होते. दि 4 जुलैइच्या मध्य रात्री या दोघात कडाक्याचे भांडण झाले. यात आरोपी सुरेश सानु पाटणकार 45 याने पत्नी शांतीच्या डोक्यावर लाकडी काठीने मारले असता पत्नी शांतीचा घटनास्थळी मृत्यू झाला. फिर्यादी भास्कर सोनबाजी वैद्य रा घारफळ यांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते . डॉगला ज्या काठीने मारल्या त्याचा हुंगा घेतला सरळ पती सुरेश यांच्या अंगावर उभा झाला .पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Updated : 2021-07-06T21:58:10+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top